Home इतर एमी पुरस्काराने सन्मानित होणारी ‘दिल्ली क्राईम’ठरली भारताची पहिली वेबसिरीज…!

एमी पुरस्काराने सन्मानित होणारी ‘दिल्ली क्राईम’ठरली भारताची पहिली वेबसिरीज…!

620
0

मराठवाडा साथी न्यूज

यावर्षी कोरोना महामारीमुळे ४८ वा ‘आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा’ व्हर्चुअली आयोजित करण्यात आला होता.दरम्यान,नेटफ्लिक्सची वेबसीरिज ‘दिल्ली क्राईम’ हिला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२० मध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड मिळवणारी ‘दिल्ली क्राईम’ ही भारताची पहिलीच वेबसीरिज ठरली आहे,भारतासाठी हे मोठ यश आहे.

‘दिल्ली क्राईम’ ही वेबसीरिज २०१२ मधे घडलेल्या दिल्लीच्या निर्भया प्रकरणावर आधारित आहे.‘निर्भया’ या प्रकरणाने संपूर्ण देश हादरुन गेला होता. दिल्लीमध्ये झालेल्या या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर हि वेब सीरिज बनविण्यात आली होती, जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सात एपिसोडच्या या वेब सीरिजमध्ये शेफाली शाह यांनी पोलीस उपायुक्त वर्तिका चतुर्वेदी ही प्रमुख भूमिका साकारली होती.यांच्या सोबतच राजेश तेलंग, आदिल हुसैन, रसिका दुग्गल, गोपाल दत्त तिवारी, जया भट्टाचार्य, अभिलाषा सिंह, विनोद शारावत, मृदुल शर्मा, अनुराग अरोरा, सिद्धार्थ भारद्वाज या कलाकारांचा समावेश आहे. ऋषी मेहता या वेबसीरिजचे लेखक-दिग्दर्शक आहेत.

या वेब सीरिजमधील प्रमुख भूमिका साकारणारी शेफाली शाह हिने व्हिडिओ ट्विट करुन सर्व सह-कलाकारांना टॅग केले आहे. तिने ट्विट मध्ये लिहिले आहे की, ‘आम्हाला एम्मी पुरस्कार मिळाला यावर माझा विश्वासच बसत नाहीये !’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here