Home बीड जिल्ह्यात आज ५७ कोरोना बाधित रूग्ण

जिल्ह्यात आज ५७ कोरोना बाधित रूग्ण

आज १५ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह तर ८४३ शिक्षकांचा अहवाल प्रलंबित

510
0

बीड : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने पुन्हा आपले डोके वर काढले असून देशाची राजधानी दिल्लीसह मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आज पुन्हा कोरोना बाधित रुग्णांनी शंभरी गाठली आहे. बीड जिल्ह्यातील ६२९३ शिक्षकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून यातील ६५ शिक्षक कोरोना बाधित निष्पन्न झाले आहेत तर ८४३ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.
आज दुपारी प्राप्त झालेल्या १६४० संशयित रुग्णांच्या अहवालांमध्ये १५८३ कोरोना निगेटिव्ह तर ५७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये बीड १९, अंबाजोगाई ११ , आष्टी ६, धारूर २, गेवराई ५, केज २, माजलगाव २, परळी १, शिरूर ४ , वडवणी ३ तर पाटोदा तालुक्यात २ पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. आज ५७ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ६५ शिक्षक कोरोना बाधित

बीड जिल्ह्यातील ६२९६ शिक्षकांनी अहवाल तपासण्यासाठी आपले नमुने दिले असून यातील ६५ शिक्षक कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर ८४३ शिक्षकांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.आष्टी तालुक्यातील ६४९ शिक्षकांच्या अहवालापैकी ९१ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून १३ कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. बीड तालुक्यातील ११७३ शिक्षकांच्या अहवालापैकी २८० शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून ९ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. धारूर तालुक्यातील २६६ शिक्षकांच्या अहवालापैकी ५ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून २ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. गेवराई तालुक्यातील ७३८ शिक्षकांच्या अहवालापैकी ५० शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून १३ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. केज तालुक्यातील ४५३ शिक्षकांच्या अहवालापैकी ७६ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून ६ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. माजलगाव तालुक्यातील ५८१ शिक्षकांच्या अहवालापैकी ६७ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. परळी तालुक्यातील ६७३ शिक्षकांच्या अहवालापैकी ११७ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून ७ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. पाटोदा तालुक्यातील ३५४ शिक्षकांच्या अहवालापैकी २४ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून ३ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. शिरूर तालुक्यातील ४०७ शिक्षकांच्या अहवालापैकी ० शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून ५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. वडवणी तालुक्यातील २०४ शिक्षकांच्या अहवालापैकी ७ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून अद्याप एकही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here