Home बृहन्मुंबई महानगरपालिका ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या वास्तूला तडे ; पुरातन विभागाचा अहवाल

‘गेट वे ऑफ इंडिया’च्या वास्तूला तडे ; पुरातन विभागाचा अहवाल

235
0

मुंबईला भेट देणारे बहुतेक लोक ‘गेटवे ऑफ कफ इंडिया’ ला भेट देत असतात. ‘गेटवे ऑफ इंडिया’ची वास्तू आणि भव्यता पाहून सर्वच जण प्रभावित होतात. पण फार कमी लोकांना माहिती असेल की, देशाच्या व्यापारी राजधानीत सागरी मार्गाचे प्रवेशद्वार तत्कालीन राजा जॉर्ज पंचम आणि ब्रिटनचे राणी मेरी, जे २डिसेंबर १९११ रोजी पहिल्यांदा येथे आले होते.

त्यांचे आभार मानण्यासाठी या वास्तूची बांधणी करण्यात आली होती. या वास्तूचे बांधकाम हे वास्तुविशारद जॉर्ज व्हिन्सेंट यांच्या नेतृत्वाखाली १९२४ मध्ये पूर्ण झाले आहे.

दरम्यान, आता याच जग प्रसिद्ध ‘गेटवे ऑफ कफ इंडिया’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. १०० वर्ष जुन्या या वास्तूला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र पुरातत्व विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टनुसार धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूला तडे गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळं ती इमारत कमकुवत होण्याची शक्यता आहे. अशी माहिती राज्य पुरातत्व विभागाने महाराष्ट्र सरकारकारला दिली आहे.

देशतीलच नव्हे तर परदेशी पर्यटकांसाठीही आकर्षण असलेली असलेल्या या वास्तूला आता तडा गेला असल्याचं समोर आलं आहे. घुमटावरील वॉटरप्रूफिंग आणि सिमेंट काँक्रीटचे देखील नुकसान झालं आहे. त्यानंतर पुरातत्व विभागाने राज्य सरकारने ६.९ कोटींचा संवर्धनाचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे.

दरम्यान, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेट वे ऑफ इंडियासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देऊ, असं आश्वासन सुद्धा दिलं आहे. मात्र, वादळे आणि लाटांमुळं गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तुला धक्का पोहोचल्याचं निदर्शनास आले असून, लवकरात-लवकरत या वास्तूची डागडुजी करण्यात यावी असं देखील पुरातत्व विभागाने राज्य सरकारला सांगितलं आहे.

गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास…

– गेटवे ऑफ इंडियाची रचना जॉर्ज व्हिन्सेंट यांनी केली होती.

– हे किंग जॉर्ज आणि क्वीन मेरी यांनी १९११ मध्ये बांधले होते.

– मुंबईतील कुलाबा येथे स्थित गेटवे ऑफ इंडिया हा एक वास्तुशिल्पीय चमत्कार आहे.

– गेटवे ऑफ इंडिया पिवळ्या बेसाल्ट आणि काँक्रीटपासून बांधण्यात आला होता.

– गेटवे ऑफ इंडियाचा घुमट बांधण्यासाठी २१ लाख रुपये खर्च करण्यात आले.

– गेटवे ऑफ इंडियाच्या पायाभरणीचे काम 1920 मध्ये पूर्ण झाले. तर, बांधकाम १९२४ मध्ये पूर्ण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here