Home मनोरंजन ‘दिलबर’ गर्ल नोराचा पिंक फ्लोरल ड्रेसमधील स्टायलिश लूक!

‘दिलबर’ गर्ल नोराचा पिंक फ्लोरल ड्रेसमधील स्टायलिश लूक!

8
0

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही स्टायलिश लूकमध्ये दिसून आली आहे. या लूकमध्ये ती फार क्लासी दिसत होती. पिंक फ्लोरल ड्रेसमधील नोराचा हा लूक फार सिंम्पल होता. परंतु, नोराने हा लूक ज्याप्रकारे कॅरी केला होता, त्यामुळे तिच्या लूकला एक वेगळा अंदाज आला.
नोरा नेहमी आपली स्टाइल आणि ड्रेसबाबत चर्चेत असते. सोशल मीडियावर ती फार अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 18. 2 M एवढी आहे. काही दिवसांपूर्वीच नोरा फतेही आणि पंजाबी सिंगर गुरु रंधावाचं नवं गाणं रिलीज झालं आहे. ‘नाच मेरी रानी’ गाणं रिलीज होताच हे गाणं यूट्यूब ट्रेडिंग लिस्टमध्ये टॉपवर आलं आहे. नोराच्या डान्सच्या व्हिडीओंवर सोशल मीडियावर चाहते लाईक्सचा वर्षाव करत असतात. काही दिवसांपूर्वी तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती लहान मुलांना रस्त्यावर डान्स स्टेप्स शिकवताना दिसून आली होती. नोराच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर, ती अजय देवगणच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसून येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here