Home आरोग्य लस घेतल्याच्या तिसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू…!

लस घेतल्याच्या तिसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू…!

446
0

मराठवाडा साथी न्यूज

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील गुंटुर जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात रविवारी(२४ जाने.)एका आशा सेविकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.यासंदर्भात अधिक माहिती देत गुंटूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सॅम्युअल आनंद यांनी सांगितले की,आशा कार्यकर्त्याच्या मृत्यूचे कारण पोस्टमार्टमनंतर समोर येईल.पुढे ते म्हणाले की,आठ दिवसात १०,९९९ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.ज्यामध्ये प्रतिकूल परिणाम झाल्याचं एकही प्रकरण दिसले नाही.दरम्यान,गवर्नमेंट जनरल रुग्णालयात आशा कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर अन्य आशा सेविकांनी रुग्णालयात आंदोलन केलं आणि पीडित कुटुंबाला ५० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, ते राज्य सरकारला कोरोना महासाथीत लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या मृत्यूबाबत बोलतील,शिवाय तिच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करतील. त्यांनी कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याव्यतिरिक्त घरासाठी भूखंड देण्याचे वचन दिले आहे. महत्वाचे म्हणजे कोरोना व्हायरसचे लसीकरण केल्याच्या तीन दिवसांनंतर २२ जाने.या आशा(वय ४४)सेविकेचे डोके दुखणे आणि तापाचा त्रास जाणवत होता.

दरम्यान,मृत आशाच्या भावाने सांगितले की,आम्ही पहिल्यांदा तिला खासगी रुग्णालयात घेऊन गेलो होतो. मात्र तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.ती शारिरीकदृष्ट्या निरोगी होती आणि कोरोना महासाथीदरम्यान न थकता ती दिवस-रात्र काम करीत होती. त्यांनी महिलेला ब्रेन स्टोक झाल्याचे मान्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here