Home औरंगाबाद राधास्वामी कॉलनीत घरफोडी चार लाख २० हजाराचा ऐवज लंपास

राधास्वामी कॉलनीत घरफोडी चार लाख २० हजाराचा ऐवज लंपास

74
0

औरंंगाबाद । घरात झोपलेल्या कुटुंबियाच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी ४ लाख २० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या हर्सूल परिसरातील राधास्वामी कॉलनी येथे उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील घुमासिंग चव्हाण (रा.प्लॉट नंबर १७, राधास्वामी कॉलनी, हर्सूल) परिसर हे एका खासगी संस्थेत संगणक शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. २१ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सुनील चव्हाण व त्यांचे कुटुंबिय जेवण करून घरात झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे चव्हाण यांच्या घराच्या हॉलचा दरवाज्याचे कडी-कोयंडा तोडून आत शिरले. हॉलमधील कपाटातील तसेच किचन रूम मधील कपाटातील सामान उचकटून ३ लाख २५ हजार रूपये किंमतीचे ८ तोळ्याचे सोन्याचे दागीने, १० हजार रूपये किंमतीचे चांदीचे दागीने व रोख रक्कम ८५ हजार रूपये असा एकूण ४ लाख २० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. गुरूवारी सकाळी सुनील चव्हाण यांची पत्नी झोपेतून जागी झाल्यावर घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी सुनील चव्हाण यांच्या तक्रारीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here