Home Uncategorized दीर्घकाळ प्रतिक्षेत ……!

दीर्घकाळ प्रतिक्षेत ……!

601
0

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई: राज्याच्या आरोग्य विभागाने मेगाभरती जाहीर करत ८५०० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरात रिक्त असलेल्या एकूण १७ हजार पदांपैकी ५० टक्के पदांसाठी आहे. यासाठी पुढच्या महिन्यात म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी २०१९ साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरतील.
या पदभरतीचा तपशील आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. रखडलेली ही जाहिरात प्रसिद्ध करुन राज्य सरकारने अनेक विद्यार्थ्यांना दिलासा दिला असल्याचं सांगितलं आहे .गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आरोग्य विभागाच्या या रखडलेल्या जाहिरातीचा एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर महाआघाडीचं सरकार आल्यानंतरची ही पहिलीच सर्वात मोठी जाहिरात आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रतिक्षेत असलेल्या अनेकांना दिलासा मिळाल्याचे समोर आलं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here