Home मनोरंजन अभिनेते अनिल कपूर यांच्या बाबतीत अफवांचे पेव…!

अभिनेते अनिल कपूर यांच्या बाबतीत अफवांचे पेव…!

537
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेते अनिल कपूर यांना कोविड-19 ची लागण झाल्याची अफवा सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. त्याला दस्तुरखुद्द अनिल कपूर आणि त्यांची मुलगी अभिनेत्री सोनम कपूर यांनी जळजळीत ट्विट करून उत्तर दिले आहे.

अनिल कपूर यांनी आपली कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली असून सोशल मीडियावरील बातम्या खोट्या असल्याचे ट्विट करत स्पष्ट केले आहे.

पण अश्या खोट्या बातम्यांमुळे अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर चिडली असून तिने ट्विट करत पत्रकारांना सल्ला दिला आहे.तिने आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे की,’चुकीच्या बातम्या देणे भयानक आहे.मी सध्या लंडनमध्ये आहे आणि मी माझ्या वडिलांशी बोलण्याअगोदरच काही मियातून चुकीची माहिती पसरवली जात आहे.कृपया पत्रकारिता जबाबदारीने करा.’

चंदीगडमध्ये ‘जुग जुग जियो’या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान नीतू सिंग आणि दिग्दर्शक राज मेहता यांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आल्याने सेटवर भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे शूटिंग थांबविण्यात आली. दरम्यान,’जुग जुग जियो’या चित्रपटात अनिल कपूर,नीतू सिंग,वरुण धवन सोबतच किनारा अडवाणी हि स्टार कास्ट दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here