Home अर्थकारण सहकारी बँका FD वर देताय 9 टक्के व्याज

सहकारी बँका FD वर देताय 9 टक्के व्याज

236
0

गुंतवणूक करण्यासाठी लोक FD वर जास्त विश्वास ठेवतात. कारण यामध्ये जोखिम खूप कमी असते. यामध्ये निश्चित काळासाठी ठेवीदारांना आपले पैसे ठेवावे लागतात. त्या काळात त्यांना ठरवून दिलेले व्याज दिले जाते.अशा वेळी ज्या बँका जास्त व्याजदर देत आहेत त्याकडे ग्राहक आकर्षित होतात. मात्र यामध्ये काही धोके देखील आहेत. आत्ताच करा आधार कार्ड व्हेरिफिकेशन, अन्यथा होईल मोठे नुकसान; ही आहे सिंपल ट्रिक

सध्या व्यावसायिक बँका FD वर 7 ते 7.5 टक्के व्याजदर देत आहेत. SBI ने 1 वर्षाच्या मॅच्योरिटीच्या डिपॉझिटवर व्याजदर 6.75 टक्क्यांवरून 6.80 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत. दुसरीकडे, सहकारी बँक आणि म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक या कालावधीसाठी जवळपास 8.50-9.50 टक्के दराने व्याज देत आहेत. ‘या’ टेक्नॉलॉजीने व्हाल मालमाल! मातीचा वापर न करता घराच्या छतावर उभारा बाग

काही स्मॉल को-ऑपरेटिव्ह बँका या बुडण्याचे प्रकरणं समोर आले आहेत. अशा स्थितीत गुंतवणूकदारांच्या ठेवींवर धोका वाढतो. नवीन नियमानुसार, बँका बुडाल्यावर एकूण ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही बँकेत 15 लाख रुपयांची एफडी केली असेल आणि ती बँक बुडली तर तुम्हाला जास्तीत जास्त 5 लाख रुपयेच मिळतील. उर्वरित 10 लाख रुपये बुडण्याचा धोका आहे. रेल्वे स्टेशनवर चहा-कॉफीपासून ते WiFi पर्यंत सर्व काही फ्री हवंय? हे क्रेडिट कार्ड आहेत बेस्ट

अनेक सहकारी बँका या अपयशी झालेल्या आहेत. सहकारी बँकांच्या तुलनेत व्यावसायिक बँका अधिक नियमांनी बांधील असतात. यामध्ये ग्राहकांना अधिक सुरक्षा मिळते. सहकारी बँकांची आर्थिक स्थिती व्यापारी बँकांच्या तुलनेत सुरक्षित नसते.अनेक सहकारी बँका यापूर्वी अपयशी ठरल्या आहेत, त्यामुळे केवळ 1.5-2 टक्के जास्त व्याजदर मिळावे म्हणून धोका पत्करणे योग्य नाही. एक्सपर्ट सांगतात की, सहकारी बँका स्थानिक शेतकरी आणि ते ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रातील लघु उद्योगांना कर्ज देतात, अशा परिस्थितीत ते अपयशी ठरतात कारण कर्ज एकाच क्षेत्रात दिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here