Home क्रीडा अखेर RCBने विजय मिळवला

अखेर RCBने विजय मिळवला

271
0

भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीला या विजयाचं श्रेय

मुंबई: महिला प्रिमियर लीगमध्ये बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने युपी वॉरीअर्स विरुद्ध शानदार खेळी खेळत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. या पहिल्या विजयानंतर कर्णधार स्मृती मानधना खूप आंनदात दिसली. स्मृतीने तिच्या संघाने खेळेल्या अफलातून खेळीचं भर भरून कौतूक केलं. त्याचबरोबर स्मृतीने भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीला या विजयाचं श्रेय देत, त्याचे कौतुक केलं.
महिला प्रिमियर लीगमध्ये या सामन्याच्या आधीपर्यंत आरसीबीचा प्रवास काही खास झाला नव्हता. त्यांना आतापर्यंत एकही विजय मिळवण्यात यश आले नव्हते. अशामध्ये युपी वॉरिअर्स सोबतच्या सामन्याआधी भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने संघासोबत गप्पा मारून त्यांना प्रोत्साहित केलं. यानंतर जेव्हा संघाने विजय मिळवला तेव्हा कर्णधार स्मृतीने विराटचं भरभरून कौतूक केलं.स्मृतीने सांगितलं की “विराट कोहलीच्या मार्गदर्शनाचा आम्हाला विजय मिळवण्यात फायदा झाला. त्याने संघासोबत गप्पा मारल्या आणि आम्हाला प्रोत्साहित केलं.” पुढे स्मृतीने सांगितलं की, विराटने तिला फलंदाजीत काही गोष्टी चांगल्या घडत नसल्या तर त्यांना स्वीकार करण्याचं महत्त्व समजवलं.स्मृतीने सामना संपल्यानंतर संघाची स्टार खेळाडू कनिका अहूजाचं कौतूक केलं आणि म्हणाली की, आम्ही ७ व्या षटकात काही विकेट्स गमवले होते ते थोडं अवघड होतं. मात्र कनिका आणि ऋचा ज्या प्रकारे खेळल्या ते कौतुकास्पद आहे. खासकरून कनिका जिच्यावर मला गर्व आहे. तिची फलंदाजी बघण्यासाठी मी उत्सूक आहे. ती वेगळा दृष्टीकोण ठेवते, ती एक ३६० डीग्री प्लेयर आहे, जी भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यात आपले खास योगदान देताना दिसू शकते.या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या युपी वॉरीअर्सने १९.३ षटकांत १० विकेट्स गमवत १३५ धावा केल्या होत्या. युपीकडून ग्रेस हॅरिसने सर्वाधिक ४६ धावा केल्या. विजयासाठी १३५ धावांच सोपं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीने ८ षटकात ५ विकेट गमवत १३६ धावा केल्या आणि दणदणीत विजय मिळवला. आरसीबीकडून कनिका अहूजाने सर्वाधिक ४६ धावांची शानदार खेळी साकारली. यूपीच्या दिप्ती शर्माने २४ धावा देत २ विकेट घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here