Home क्राइम वीजचोरी करणाऱ्या दोघांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा

वीजचोरी करणाऱ्या दोघांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा

349
0

छत्रपती संभाजीनगर:शहरातील कुमावतनगर व अय्यप्पा मंदिर परिसरात आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्या दोघांवर वेगवेगळ्या प्रकरणांत सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महावितरणच्या रेल्वे स्टेशन एमआयडीसी शाखेचे सहायक अभियंता दादासाहेब काळे त्यांचे सहकारी प्रधान तंत्रज्ञ एस.पी. शाहीर व ए.एस. ताकपिरे यांच्यासह कुमावतनगर येथे तपासणी मोहिमेसाठी गेले होते. गट नं.१३८ मधील प्लॉट क्र.४५/पी येथील संजय प्रल्हाद चव्हाण यांच्या घरातून जवळच असलेल्या महावितरणच्या लघुदाब वाहिनीवर आकडा टाकलेला आढळला.दोन वर्षांपासून वीजचोरी केल्याचे आढळले. ३७३४ ‍युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी अधिभारासह ५७ हजार ९९० रुपयांचे निर्धारित बिल दिले. या घरात पूर्वी सिद्धराम दत्तात्रय जगताप या नावाने वीजजोडणी होती. मात्र ६९ हजार ७५० रुपयांच्या थकबाकीपोटी १३ डिसेंबर २०१७ रोजी वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता.‍ वीजचोरीचे ५७ हजार ९९० रुपये व तडजोड शुल्क ४ हजार रुपये असे बिल दिले असता बील न भरल्याने संजय प्रल्हाद चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या प्रकरणात अय्यपा मंदिर परिसरातील गट नं.१४१ मधील घरासाठी दीपक भारत वाघमारे याने महावितरणच्या लघुदाब वाहिनीवर आकडा टाकलेला आढळला. १८५० ‍युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी अधिभारासह २५ हजार ९८० रुपयांचे निर्धारित बिल व तडजोड शुल्क ४ हजार रुपये असे बिल भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here