Home क्रीडा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून, दोन खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता

कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून, दोन खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता

210
0

टीम इंडियाचे तीन खेळाडू आहेत ज्यांना उद्या चेन्नई येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून वगळणार आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे उद्या चेन्नई येथे होणारा तिसरा वनडे जो संघ जिंकेल तो मालिका जिंकेल.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना उद्या दुपारी दीड वाजता चेन्नई येथे खेळल्या जाणार आहे. कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल करू शकतो.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील तीन खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे.प्रथम सूर्यकुमार यादवला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळेल. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये जखमी श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती, परंतु सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीत फ्लॉप ठरला.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव सलग दोनदा गोल्डन डकवर बाद झाला आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा सूर्यकुमार यादवला डावलून तिसऱ्या वनडेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या इशान किशनला संधी देईल.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये आणखी एक मोठा बदल करताना चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवेल. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संधी दिल्या जाईल.
रोहित शर्मा , शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, उमरान मलिक, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here