Home मनोरंजन आता अवयवांचीही नावे बदलतील …..

आता अवयवांचीही नावे बदलतील …..

467
0

जावेद अख्तर यांचा ट्विटरवरून भाजपाला टोला

सध्या देशभरात नामांतराचा काळ सुरु आहे. अगोदर उत्तर प्रदेश मागग आता औरंगाबादचे नामांतर करण्याचा वाद सुरु आहे. आता यात अजून भर म्हणजे फळांचींनी नामांतर केले जात आहे. भाजपाचं सरकार असलेल्या गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी थेट फळाचं बारसं केलं आहे. ड्रॅगन फ्रुट म्हणून प्रसिद्ध असलेल्या फळाचं रुपाणी यांनी नामाकरण केलं असून, गुजरातमध्ये ड्रॅगन फ्रूट कमलम (कमळ) या नावानं ओळखलं जाणार आहे. दरम्यान बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी या विषयासंबधी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जावेद अख्तर यांनी एक ट्वीट केले आहे. ‘गुजरातचे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले की ड्रॅगन फ्रूट हे कमळासारखे दिसते. त्यामुळे त्याचे नाव कमलम असे असायल हवे. शानदार. पहिले शहरांची नावे आणि आता फळांची. काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावंही बदलतील. खरच हे सर्व मजेदार आहे’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. सध्या त्यांचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here