Home मुंबई आदित्य ठाकरेंचं फडणवीस यांच्याबद्दल मोठं विधान : आजही देवेंद्र फडणवीस आणि वडील...

आदित्य ठाकरेंचं फडणवीस यांच्याबद्दल मोठं विधान : आजही देवेंद्र फडणवीस आणि वडील उद्धव ठाकरे याचे संबंध चांगले

428
0

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांचे आणि वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध होते आणि ते आजही आहेंत.आमच्या मनात कधीही कटुता नव्हती. आमच्या घरात आम्ही कुणालाही व्यक्तिगत पातळीवर शत्रू मानत नाही’ असं वक्तव्य माजीमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी यांनी केलं आहे.
‘लोकमत डिजिटल क्रिएटर्स अवॉर्ड’ वितरण समारंभ पार पडला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या प्रश्नावर भाष्य केले.गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या कुटुंबावर अनेक आरोप करण्यात आले अगदी खालच्या थराला जावून आरोप करण्यात आले. कधीही माझ्या तोंडातून याबद्दल कधीही अशी विधानं आली नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.’त्यांच्या मनामध्ये सुरू होतं. आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला काय हवं आहे, पण त्यांनी काहीही म्हटलं नाही. जर बंडखोरी केली असती तर चाललं असतं. पण, त्यांनी गद्दारी केली आहे. पाठीवर त्यांनी खंजीर खुपसला आहे. ज्यांनी स्वता: ला विकलं, जे आधीच विकले गेले होते. त्यांना कसं समजावून सांगणार होतो, असा खुलासा आदित्य ठाकरेंनी केला
मी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं होतं. तुम्ही माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, नाहीतर मी तुमच्या ठाण्यातून निवडणूक लढवून दाखवतो, पण ते हिंमत दाखवत नाही, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.
आजची राजकीय परिस्थितीत पाहिली तर लोक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा आहे, दोन्ही कुटुंब एकत्र येतील का? अमित आणि आदित्य ठाकरे एकत्र येतील का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला.
यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, मी रोज कामावर आणि धोरणावर बोलत असतो. जे योग्य आणि अयोग्य आहे, त्यावर चर्चा करत असतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत बरीच चर्चा झाली आहे. ती वैयक्तिक आहे. कुणी कुणाशी युती केली पाहिजे किंवा नाही केली पाहिजे, हे वैयक्तिक आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here