Home क्रीडा बुमराह आयपीएलमधून बाहेर;वर्ल्ड कपच काय ?

बुमराह आयपीएलमधून बाहेर;वर्ल्ड कपच काय ?

438
0


मुंबई इंडियन्सना मुंबई इंडियन्सना मोठा धक्का

मुंबई :आयपीएल 2023 च्या तोंडावर मुंबई इंडियन्सना मोठा धक्का बसला आहे. बुमराह आयपीएल 2023 मधून बाहेर झाला आहे, तसंच तो आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपही खेळू शकणार नाही. वनडे वर्ल्ड कपवर लक्ष ठेवून बीसीसीआय बुमराह आणि एनसीएसोबत बोलून लवकरच त्याच्या शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेऊ शकते.मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बुमराहला दुखापत झाली होती. बुमराहला पाठदुखीचा त्रास सुरू झाला होता, त्यामुळे तो आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपही खेळू शकला नव्हता. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार बुमराह आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपही खेळू शकणार नाही. वनडे वर्ल्ड कपपर्यंत बुमराह फिट होईल, अशी आशा भारतीय क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत. दुखापतीतून बरं होण्यासाठी बुमराहला शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
डिसेंबर महिन्यामध्ये बुमराहने बॉलिंगला सुरूवात केली होती, यानंतर तो फिटही झाला होता. त्यामुळे निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या व्हाईट बॉल सीरिजमध्ये बुमराहची निवड केली होती, पण तो पूर्णपणे फिट नसल्याचं समोर आलं आणि त्याला या सीरिजमधून नाव मागे घ्यावं लागलं.बुमराह सध्या एनसीएमध्ये रिहॅब करत आहे. मागचा काही काळ बुमराहसाठी निराशाजनक राहिला आहे, त्यातच आता भारतीय चाहते आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठा धक्कादायक बातमी आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here