Home क्रीडा हड्डीया तोड दि पर बंदा तस से मस नही हुआ ……

हड्डीया तोड दि पर बंदा तस से मस नही हुआ ……

380
0

सिडनी :ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चहापानापर्यंत ३ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारली. खेळपट्टीवर स्थिरावलेला शुबमन गिल शतकापासून ९ धावा दूर असताना बाद झाला. कर्णधार अजिंक्य रहाणे धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चेतेश्वर पुजारावरही अनेक प्रहार करण्याचे प्रयत्न केले.पण पुजाराने हार न मॅनटा तो मैदानात टिकून आहे.

मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या तीन वेगवान गोलंदाजांनी सातत्याने पुजाराच्या शरीराच्या जवळपास मारा केला. चेंडूला मिळणारी उसळी पाहता अनेक चेंडू पुजाराने अंगावर खाल्ले. स्वत:ची विकेट वाचवताना एक चेंडू पुजाराच्या खांद्याजवळ येऊन आदळला. एक चेंडूच्या उसळीमुळे पुजाराच्या बोटाला प्रचंड वेदना झाल्या. एक चेंडू तर अतिशय जोरदार उसळी घेऊन थेट त्याच्या हेल्मेटवर आदळला. चेंडूच्या वेगाने हेल्मेटची क्लिप निघून जमिनीवर पडली. पण अनेकविध फटके अंगावर झेलून पुजाराने अतिशय शांतपणे फलंदाजी सुरू ठेवली. हड्डीया तोड दि पर बंदा तस से मस नही हुआ असेच काहीसे पुजाराने करून दाखवले आहे. त्यामुळे त्याच्या या धीराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here