Home आरोग्य राज्यात बर्ड फ्लूचे थैमान…!

राज्यात बर्ड फ्लूचे थैमान…!

292
0

मराठवाडा साथी न्यूज

BMC कडून हेल्पलाईन जारी

मुंबई : कोरोनाचे संकट असतानाच आता देशात आता बर्ड फ्लूचे थैमान आले आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग अवघ्या १० राज्यांमध्ये पसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत केरळ,राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या माहिती समोर आली आहे.महाराष्ट्रात परभणी, मुंबई, दापोली अशा विविध भागांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची माहिती मिळाली आहे.

कुक्कुट पालन व्यवसायात असणाऱ्यांना या बर्ड फ्लूमुळे फार दडपण आले आहे. मात्र,जर आपण उकडलेली अंडी, शिजवलेले चिकन खाण्यात कोणताही धोका नाही, कारण हा विषाणू उच्च तापमानामध्ये नष्ट होतो.त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता कुठेही पक्षी मृतावस्थेत आढळल्यास प्रशासनाला याबाबतची माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान,मुंबईत मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांच्या चाचणीतून बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याची माहिती स्पष्ट झाली आहे.ही बाब कळताच प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या.यामध्ये पक्षी कुठेही मृतावस्थेत आढळल्यास नागरिकांनी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधत याबाबतची माहिती द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here