Home मराठवाडा दिव्यांग बालकांच्या जीवनात शिक्षक व पालकांची भूमीका

दिव्यांग बालकांच्या जीवनात शिक्षक व पालकांची भूमीका

1451
0

जागतिक अपंग दिन विशेष

सन 1959 साली म्युरे (मनोशास्त्रज्ञ) ह्यांनी सांगितले दिव्यांग मुलांच्या (बालकाच्या ) पालकांची सर्वात महत्वाची गरज म्हणजे त्यांना व्यवस्थित प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन आवश्यक आहे.
एखादया कुटुंबात दिव्यांग मुल असल्यास कुटुंबातील व्यक्ती पुढे बरेच प्रश्न उभे राहातात तसेच परिस्थितीला सामावून घेणे कठीण जाते. अशा बालकाच्या अस्तित्वामूळे कुटुंबावर फार परिणाम होतो. जास्त आई वडीलांवर, त्यांना हा आघात सहन करणे कठीण जाते. त्यांना वेळोवेळी मानसिक आधाराची गरज असते.
हा आघात प्रत्येक पालक हा त्यांच्या पद्धतीने सहन करतात कांही जण व्यावसायिकांची मदत न घेता बालकाची स्थिती मान्य करतात. कांही पालकांना कित्येक तज्ञ मार्गदर्शनाची गरज लागते. अजून प्रश्न उभा राहतो. खरच सर्वजण हा आघात समाज स्वीकारेल का ?
कित्येक पालक मतिमंद मुलाला मानसिक आजार मानतात, कांहीना वाटते तो मोठा झाल्यावर सर्व सामान्यांसारखा होईल. त्याचा प्रश्न हा त्याचे लग्न झाल्यावर सुटेल. पालकांच्या अशा विचारामुळे मतिमंद विद्यार्थ्यास शिकविण्यास, प्रशिक्षणाचा कार्यकम ठरविण्यात फार दऱ्या उभ्या राहातात. समाजाकडून त्यांना फार सहन करावे लागते.
कोणतेही मुल जन्माला आल्यानंतर त्याची आपोआप प्रगती होत नाही. त्यासाठी पालकांचे प्रेम मुलाशी नाते ते कशा प्रकारे कशा वातावरणात वाढवितात ह्यावर अवलंबुन असते.
एखाद्या घरात अपंग बालक जन्मास आले तर त्यास सामाजिक संस्था ह्या फक्त मार्गदर्शन करतील किंवा शैक्षणिक सुविधा पुरवितील परंतू सर्व संस्कार करणे, प्रेम देणे, कुटुंबातील एक घटक मानणे हे पालकांनाच करावे लागते. पालक हे बालकाच्या पहिला महत्वाचा प्रभावी शिक्षक आहे. मुलांची शैक्षणिक वाढीत ही पालक त्यास कसे मदत करतात किंवा शिकवितात ह्यावर अवलंबून असते. शैक्षणिक कार्यक्रमात पालकांचा सहभाग जेवढा जास्त तेवढी बालकांची प्रगती चांगली होते. संशोधनाने असे आढळून आले आहे की, मुलांच्या वाढीवर घराच्या वातावरणाचा प्रभाव सर्वात जास्त असतो.
विशेष मुलांच्या बाबतीत शिक्षक व पालकात मैत्रीचे संबंध असावेत त्यामुळे शाळा आणि घर ह्यातील नाते दुरचे राहाणार नाही, पालकांनी मुलाच्या शिक्षणात उत्साही तसेच दक्ष राहिले पाहिजे. शिक्षक हे पाल्यासाठी जो कार्यक्रम बनवितात, त्याची अमलबजावणी करतात आणि तो पुढे चालू ठेवतात. ह्यात पालकाचा सहभाग, साथ ही बालकास प्रगतीपथावर नेण्यास मदत करते त्याचे बरोबर इतर व्यावसायिकाची मदत घेतली तर त्यामुळे विकास साधता येतो.
शाळा आणि घर ह्या द्वारे शिक्षक व पालक घडवित असतात. त्यावेळी समाजाला विसरुन चालणार नाही तो त्या समाजाचा एक घटक आहे. त्यांचे प्रोत्साहन असेल तर त्यांना सुध्दा सामावून घेणे आवश्यक आहे की, ज्याद्वारे बालकास समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे शक्य होईल.
पालाकांना त्यांचे मूल हे दिव्यांग आहे हे सांगण्यापेक्षा त्यांच्या जबाबदाऱ्यांना तोंड देणे किंवा तोंड देत असलेल्या अडचणी सोडविण्यास मार्गदर्शन करणे हे जास्त सहज आहे. शाळा व घर ह्यात समन्वय चांगला ठेवला पाहिजे. पालक हे शाळेपासून दुर राहिले तर शिक्षकांच्या मेहनतीस यश येवू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत बरेच अडथळे निर्माण होतात. आणि घरात पाल्याच्या बऱ्याच अडचणी उभ्या राहतात ते पालकांना सोडविणे कठीण जाते.
शिक्षक व पालकांचे सलोख्याचे सबंध बऱ्याच अडचणी सोडविण्यास मदत करतात त्यामुळे पालक हे शाळेपासून दूर जात नाहीत.
अपंग बालक हा पालकांचा आणि शिक्षकांचा केंद्र बिंदू असतो, दोघांचे उद्देश सारखे असतात ते साधण्यासाठी त्याच्यातील नाते, संबंध चांगले पाहिजेत, त्याच्यात एकमेकांना सांभाळून घेण्याची समजावून घेण्याची इच्छा पाहिजे की, ज्याद्वारे बालाकांची प्रगती साधण्यास शक्य होईल त्यांचे संबंध समजूतीचे किंवा सलोख्याचे राहिले नाही तर विचारांच्या तफावतीची दरी निर्माण होऊन बालक हा बळी पडतो. त्याच बरोबरीने शाळेचे वातावरणही चांगले पाहिजे.
शिक्षकांनी व पालाकांनी एकमेकांच्या समस्या समजावून घेऊन सोडविण्यास मदत केली पाहिजे.

शिक्षक :-
1) अपंग बालाकाला स्पर्श करा जसा त्याच्या पालकाचा असतो तसा.
2) बालाकांचे कौतूक करा जसे पालक करतात तसे.
3) बालाकांना चुकी बद्दल बोला शिक्षा करा ज्या प्रकारे पालक करतात तसे पालकांचे शाळेबद्दल किंवा शिक्षकांबद्दलचे मत हे त्यांच्या दाखवित असलेल्या उत्तरावर अवलंबून असते.

पालक :- बालकांचे शाळेत जाण्यासाठी मन वळवा.
शाळेच्या कार्यक्रमात आपला सहभाग ठेवा.
बालाकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेला जेवढे सहकार्य, मदत देता येईल तेवढे द्यावे.
शाळेच्या सभा किंवा चर्चा सत्रात उपस्थित राहावे.

बरेच पालक बघ्याची भूमिका बजावितात शाळेत बालकास पाठविल्यानंतर शाळा आणि शिक्षक काय करतात यावर नजर ठेवतात. ते समजतात की, शाळा हीच फक्त विद्यार्थ्यांचे प्रगतीचे स्थान आहे ते त्याच्या शैक्षणिक व वर्तणूक समस्या सोडवू शकतात शाळे बाबतच्या गैर समजूती पुढील प्रमाणे असतात.
1) शाळा ही नियम बनविणारी व नियमाचे अमलबजावणी करणारी संस्था आहे.
2) शिक्षक हा त्याचा पगारी नौकरीदार आहे.
3) शिक्षकानीच आणि शाळेने आपल्या पाल्याची सर्व सोय तसेच त्याची प्रगती घडवायची आम्ही फक्त बघण्याची भूमिकेतून त्यांच्या चुका काढू किंवा बालकांच्या प्रगती बद्दल जबाबदार धरु.


शिक्षकांची भूमीका :- शिक्षकांची भूमीका ही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमाच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असते.
• शिक्षक हा पालकांचा सर्वात जवळचा घटक तो त्यांच्या अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन करणारा असतो.
• विचारांची देवाण घेवाण करणारा असतो.
• कार्यक्रम बनवून तो अवलंबिणारा असतो.
• पुढील प्रगतीचे मार्गदर्शन करणारा असतो.
• मित्र असतो.

शिक्षक व पालकांचे संबंध (नाते):
समाजाला असे वाटते की, प्रत्येक पालकांना सशक्त आणि चांगले मूल व्हावे. परंतू ज्या पालकांनी अपंग बालकाला जन्म दिला त्यांना मदत करण्या ऐवजी त्यांना दोषी ठरवितात. त्यांना मनोधैर्य देण्याऐवजी त्यांचे मनोबल कमकुवत करतात. कळत नकळत त्यांचा दोष नसतांना पालका बरोबर बालकांस वाळीत टाकतात ज्या बालकांचे फुल होणार नाही परंतु ते उमलणार आहेत त्यास त्याच्या पध्दतीने उमलण्यास मदत करीत नाहीत. ही मदत पालकांना जेव्हा विशेष शाळां मार्फत मिळते तेंव्हा त्यात आशेचा किरण दिसतो. शिक्षक हा शाळेचा महत्वाचा घटक असतो तो बालकांना घडविणारा असतो परंतु पालकांनी त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे करुन आपल्या पाल्याचा समस्या सोडविण्यास मदत घ्यावी. त्याचवेळी शिक्षकांच्या अडचणी हया लक्षात घ्याव्यात. इतर व्यावसायिकांची मदत घ्यावी आणि केलेल्या मार्गदर्शन व सुचना लक्षात घ्याव्यात परंतु शाळेवर सर्व भार टाकून बघ्याची भूमिका घेवू नये हा आपलाच आणि आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे आणि तो आपणच सोडविला पाहिजे.
शाळा, समाज किंवा शिक्षक व इतर व्यावसायिक फक्त आपणास मार्गदर्शन दाखवितील ते फक्त वाटण्याची भूमिका करतील परंतु वाट शोधत मार्ग अवलंबविणे हे
आपलेच काम आहे.

शिक्षकांनी पालकांशी बोलतांना किंवा मार्गदर्शन करतांना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

  1. आपण असे समजून घेऊ नये की, आपणास पाल्याबद्दल सर्व माहिती आहे.
  2. दररोजच्या आणि साध्या भाषेत पालकांशी बोलावे.
  3. पालकांशी वादावादी करु नये किंवा त्यांना कमी लेखू नये.
  4. आपल्या बोलण्याचे सामाजीकरण करु नका.
  5. आपली प्राथमिक गरज बालकासाठी आहे.
  6. पालकांना सत्य परिस्थितीचा विचार करण्यास लावावा.
  7. पालकांना पाल्यात कांही सुधारणा करता येईल असेच मार्गदर्शन करावे.
  8. आपणास जर कांही माहिती नसेल तर नाही म्हणावे परंतु चूकीची माहिती किंवा मार्गदर्शन करु नये.

पालक मार्गदर्शन
 पालकांनी मुलासोबत मातृभाषेतच बोलावे.
 मुले पालकाचे अनुकरण करतात, त्यामुळे पालकांनी लाडाने बोबडे मुलांशी बोलल्यास मुले त्याच प्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पालकांनी मुलांशी स्पष्ट बोलावे.
 मुलांशी बोलातांना खाणा-खुणा, हातवारे याचा वापर टाळा.
 भाषेच्या विकासाठी शब्दसंग्रह वाढवीणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील वस्तूचे नावे म्हणजे मुल पाणी मागण्यासाठी हाताद्वारे खाणा-खुणाद्वारे इच्छा व्यक्त करत असेल तर पालकांनी मुलाला पाणी पाहिजे काय? पाणी शब्द मुलांकडून उच्चरुन घ्यावा. पाणी ग्लास मध्ये घेऊन पितात हे त्यांना ज्ञान होईल. अशाप्रकारे दररोजच्या वापरातील वस्तूंचे नांवे उच्चवरुन मुलांचा शब्दसंग्रह पालकांनी जास्तीत जास्त वाढवावा.
 मुलांचे शब्दोच्चारण व्यवस्थित नसेल त्यामागील कारण शोधून काढावे. मुलांमध्ये जन्मजात व्यंग म्हणजे जबडा, ओठ किंवा टाळू यांच्या रचनेत दोष आढळून आल्यास तज्ञ डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा.
 मुलांचे बोलतांना स्पष्ट शब्दोच्चरण होण्यासाठी मुलांचे श्वसनाचे व्यायाम घ्यावे. फुंकर मारुन मेणबत्ती विझवणे.

मुलांना भाषा विकासाठी वेगवेगळ्या तंज्ञांच्या उपयोग केला जाऊ शकतो. त्यात प्रथम आवडी निवडी लक्षात घेणे आवश्यक असते, प्रोत्साहीत करण्यासाठी वापरण्यासाठी तंत्रे.

  1. अपेक्षित कृती केल्यास त्याला आवडणारी वस्तू देऊन प्रोत्साहित करणे.
  2. अपेक्षित कृती केल्यास Social Reward द्वारे प्रोत्साहित करणे. उदाः त्याला जवळ घेणे. पाठ थोपाडणे, शाबासकी देणे इत्यादी .
  3. आवडणारी कृती करण्याकरीता संधी उपलब्ध करुन देणे उदाः कार्टून पाहण्याची संधी, त्याला आवडणारे खेळ खेळण्याची संधी.

लेखक
नितीन एस. निर्मल
– ९१७५१०९३३३
आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय
(नांदेड) मुख्याध्यापक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here