Home मनोरंजन विरुष्काच्या घरी लक्ष्मीचे आगमन;ही व्यक्ती ठेवणार नाव…!

विरुष्काच्या घरी लक्ष्मीचे आगमन;ही व्यक्ती ठेवणार नाव…!

415
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अर्थात विरुष्का यांच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे.स्वतः विराटने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.काल (११ जाने.) ब्रीच कॅण्डी इस्पितळात अनुष्काने बाळाला जन्म दिला.

https://www.instagram.com/p/CJ5taE5FKtb/?utm_source=ig_web_copy_link

अनुष्काने मुलीला जन्म दिल्यानंतर आता नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.बाळाचा जन्म झाल्यानंतर तिचे नाव काय असेल याबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आलेले असतांनाच ‘विरुष्का’च्या मुलीचा पहिला फोटो व्हायरल झाला. विराटचा भाऊ विकास कोहली याने एका लहान बाळाच्या पावलांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. जे विराटच्याच लेकीचा फोटो असल्याचे म्हणत नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

https://www.instagram.com/p/CJ5wWUJDfcs/?utm_source=ig_web_copy_link

अनेक वेब पोर्टलच्या वृत्तांनुसार विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलीचे नाव ‘अन्वी’ ठेवल्याचे म्हटले जात आहे.फक्त एव्हढेच नाही तर बाबा अनंत महाराज हे अधिकृतपणे तिचे नाव ठेवणार आहेत.अशीही चर्चा रंगली आहे.कारण,अनुष्का आणि विराटच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांच्या चर्चा जेव्हा समोर येतात तेव्हा अनंत महाराज हे नावही समोर येत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here