Home अर्थकारण अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा;वेतनाचा प्रश्न मिटला

अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा;वेतनाचा प्रश्न मिटला

388
0

मुंबई :मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात शहरी भागातील नागरिकांना दिलासा देतानाच सरकारने कृषी क्षेत्रावर भर दिला आहे.दरम्यान या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांच्या वेतनाबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांनी वेतनवाढ द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत आंदोलन केले होते. दरम्यान सरकारने अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ केली आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात सुमारे ८१ हजार आशा सेविका, ३ हजार ५०० गटप्रवर्तक आहेत. आशा सेविकांचे मानधन साडेतीन हजार आहे. तर गटप्रवर्तक यांचे मानधन चार हजार सातशे रुपये आहे. या मासिक मानधानात प्रत्येकी दिड हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन ८ हजार ३०० रूपयांवरुन १० हजार करण्यात आले. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार ९७५ वरून ७ हजार दोनशे रूपये करण्यात आले आहे. तसेच अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४ हजार ४२५ वरून ५ हजार ५०० रूपये करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here