Home अमरावती जिल्ह्यात १५ ते १८ मार्च‎ दरम्यान पावसाची शक्यता‎;काही भागात तुरळक, तर...

जिल्ह्यात १५ ते १८ मार्च‎ दरम्यान पावसाची शक्यता‎;काही भागात तुरळक, तर काही ठिकाणी गारपीट‎:

397
0

अमरावती:पश्चिमेकडून तसेच पूर्वेकडून‎ वाहणाऱ्या वाऱ्याच्या संगमामुळे‎ जिल्ह्यात १५ ते १८ मार्चदरम्यान‎ मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची‎ शक्यता आहे. तसेच काही भागात‎ तुरळक तर काही भागात मध्यम‎ पाऊस, गारपीट होऊ शकते. असा‎ अंदाज भारतीय हवामान विभागाच्या‎ प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांनी‎ वर्तवला असल्याची माहिती कृषी‎ विज्ञान केंद्र, दुर्गापूरचे कृषी हवामान‎ शास्त्रज्ञ डॉ. सचिन मुंढे यांनी दिली.‎ जिल्ह्यात १५ ते १८ मार्चदरम्यान‎ तुरळक तसेच एक ते दोन ठिकाणी‎ हलका ते मध्यम पाऊस होणार आहे.‎ याच काळात प्रतितास ४० ते ५० किमी‎ वेगाने वारे वाहणार आहे. या काळात‎ आकाश ढगाळ राहणार आहे. अशा‎ वातावरणामुळे भाजीपाला व फळ‎ पिकाची काढणी लवकर करून‎ घ्यावी. तसेच आता हरभरा आणि गहू‎ परिपक्व स्थितीत आले आहे. त्यामुळे‎ ज्या शेतकऱ्यांनी अजूनही काढणी‎ केली नसेल त्यांनी काढणी करून‎ घ्यावी.
वाऱ्याचा वेग अधिक राहणार‎ असल्यामुळे संत्रा फळांची तोडणी‎ करून घ्यावी. फळबागेतील झाडांना‎ बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार‎ द्यावा. परिपक्व झालेली टरबूज आणि‎ खरबुजाची फळे तोडून घेऊन‎ सावलीत ठेवावी. तसेच कांदासुद्धा‎ काढून घ्यावा. सोबतच बाजार‎ समितीमधील उघड्यावर ठेवलेल्या‎ मालाला ताडपत्रीने झाकून ठेवावे‎ किंवा शेडमध्ये माल ठेवण्याची‎ व्यवस्था करावी, असे आवाहन कृषी‎ विज्ञान केंद्र दुर्गापूरचे (बडनेरा) वरिष्ठ‎ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के. पी. सिंह‎ आणि कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ.‎ सचिन मुंढे यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here