Home मनोरंजन अर्थपूर्ण आयुष्याची सुरुवात…!

अर्थपूर्ण आयुष्याची सुरुवात…!

55
0

मराठवाडा साथी न्यूज

स्वप्नील’ पासून ‘साईशा’ पर्यंतचा प्रवास

मुंबई : आपल्यातले खरेपणा काय हे ओळखायला स्वप्नील ला फार वेळ लागला.मात्र,जेव्हा त्याला त्याच्यात असणारी ती कळाली तेव्हा स्वप्नील चे जगच बदलून गेले आणि सुरुवात झाली त्याच्या ‘अर्थपूर्ण आयुष्याची’.ही कहाणी आहे बॉलीवूड मधील नावाजलेला सेलिब्रिटी फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे म्हणजेच आत्ताच्या ‘साईशा’शिंदे ची.

स्वप्नील यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून जीवनातील या महत्त्वाच्या बदलाची माहिती आताच्या साईशाने सर्वांसमोर आणली आहे.सोबतच आपल्या नावाचा अर्थही साईशाने सर्वांना सांगितला.’साईशा,म्हणजेच अर्थपूर्ण आयुष्य….’

स्वप्नील या पुढे ट्रान्सवूमन म्हणून जगणार आहे.याविषयी माहिती देत त्याने इंस्टाग्राम अकाउंट वरील पोस्ट मध्ये लिहिले आहे की, ‘तुमच्या बालपणीच्या काही आठवणी जागवणाऱ्या अशा अनेक गोष्टी असतात. माझ्यासाठी हे सर्व म्हणजे एकाकीपणा,एक प्रकारचे दडपण आणि मनातील कोलाहलाने प्रत्येक क्षणाला होणारा माझा गोंधळ इतकेच’, असे या पोस्टच्या सुरुवातीलाच लिहिले गेले. ज्यावेळी शाळा आणि महाविद्यालातील मुले आपल्याला वेगळे म्हणून हिणवायचे तेव्हा होणाऱ्या यातना या शब्दांपलीकडच्या असल्याचे इथे न चुकता नमूद करण्यात आले. हे जगणे आपले स्वत:चे नसल्याची माहिती असतानाही आपण या समाजाच्या अपेक्षा आणि अटींपोटी जगत होतो. पण, ऐन तारुण्यावस्थेतच मी हे सत्य स्वीकारले आणि खऱ्या अर्थाने आयुष्य बहरले’.

स्वप्नील च्या ह्या धाडसी निर्णयाचे सेलिब्रिटींपासून ते कला विश्वातील अनेक मित्रमंडळींकडून कौतुक करण्यात आले आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.दरम्यान, हा बदल सर्वांकडून इतक्या सकारात्मक पद्धतीने स्वीकारण्यात आला की,शिंदे यांना आता त्यांचा स्टाफही ‘मॅम’ म्हणून संबोधत आहे.

https://www.instagram.com/p/CJp3YqwMwRG/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here