Home क्राइम या राज्यात आता ‘लव जिहाद’ विरोधात होणार कायदा

या राज्यात आता ‘लव जिहाद’ विरोधात होणार कायदा

1219
0

बेंगलुरु: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुराप्पा यांनी ‘लव जिहाद’ विरोधात कडक कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणा हे राज्यही आता यासंबंधी कायदा करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘लव जिहाद’चा प्रकार राज्यात घडल्यास आरोपीचे ‘राम नाम सत्य’ अशा शब्दात इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजप शासित कर्नाटक राज्यातही ‘लव जिहाद’ विरोधात कायदा करण्याची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले कि, राज्य सरकार ‘लव जिहाद’ विरोधात लवकरच कायदा करणार आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सर्व चर्चा झाली आहे. येत्या दोन- तीन दिवसात कायद्यासंबंधी निर्णय जाहीर करण्यात येईल. अन्य राज्यात लव जिहादवरुन काय स्थिती आहे याच्याशी कर्नाटकचे देणंघेणं नाही. लव जिहाद विरोधात राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल असेही मुख्यमंत्री बी.एस.येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले.

हरियाणाही कायदा करायच्या तयारीत
हरियाणात राज्यातही भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे या राज्यातही सरकार गतवर्षी हिमाचल प्रदेश सरकारने ‘लव जिहाद’ वर विधेयक मंजूर केले होते. त्यामध्ये बळाचा वापर करुन किंवा प्रलोभनाच्या आधारे लग्न करुन मुलींचे धर्मांतर करणे हे बेकायदेशीर आणि दंडास पात्र असेल अशी तरतुद आहे. त्यामुळे हरियाणा सरकारने हिमाचल प्रदेश सरकारकडून याबाबत माहिती मागवली आहे. हरियाणाच्या वल्लभगड येथील निकिता तोमर हत्या प्रकरणात लक्षवेधीच्या प्रश्नाला उत्तर देताना अनिल विज बोलत होते. पुढे बोलताना विज म्हणाले कि, हरियाणात ‘लव जिहाद’ विरोधात कायदा अमलात आणण्याच्या तयारीत आहोत. निकिता तोमरच्या कुटुंबीयांना सर्वप्रकारे सुरक्षा पुरवण्यात आली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टासमोर हे प्रकरण चालवले जाईल. आरोपी तौसिफचा संबंध एका राजकारणी परिवाराशी असल्याने यात सहभागी असणाऱ्यांना बारा तासांच्या आत पकडण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.


काय आहे निकिता तोमर प्रकरण

26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी निकिता तोमर ही कॉलेजचा पेपर देऊन घरी निघाली होती. त्यावेळी दोन आरोपींनी तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. निकिताने त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली तेव्हा एका आरोपीने तिच्यावर रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या. त्याचवेळी निकिताचा मृत्यू झाला. आरोपीने लग्नासाठी निकितावर धर्म परिवर्तन करण्यासाठी जबरदस्ती केली होती असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

निकिता तोमर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here