Home क्रीडा रोहितमुळे कापली अर्धी मिशी…!

रोहितमुळे कापली अर्धी मिशी…!

600
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : India vs Australia 3rd Test भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याकडे सगळ्यांचेच लक्ष लाजले आहे. त्यातही भारतीय क्रीडा रसिकांमध्ये यासाठी फार उत्सुकता दिसत आहे. हीच उत्सुकता पायी सध्या सोशल मीडियावर एका गृहस्थांचा फोटो व्हायरल होतांना दिसत आहे.

हा फोटो व्हायरल होण्याचे कारण म्हणजे या काकांनी रोहित शर्माच्या नावे लावलेली एक पैज हरल्यामुळे चक्क स्वत:ची अर्धी मिशीच कापली आहे.रोहितचा कसोटी संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला.मात्र,अजय नावाच्या एका ट्विटर युजरने ट्विट करत, ‘रोहित कसोटी क्रिकेटपटू असेल तर मी जगातला सर्वात हँडसम् पुरुष आहे. ब्रॉड आणि अँडरसनचं एकेक षटक खेळून काढून दाखवू दे त्याला. ते जाऊ दे. स्टार्क, हेजलवुड आणि कमिन्स यांचे सगळे मिळून तीस चेंडू खेळून काढू दे, मी अर्धी मिशी काढून टाकतो’, असे लिहिले.

पण पैज हरल्यामुळे या गृहस्थांनी चक्क अर्धी मिशी कापली. त्यांचा हा फोटो पाहून सुरुवातीला अनेकांना धक्काच बसला.मात्र,त्यावरही यांनी स्पष्टीकरण देत लिहिले की, ‘बऱ्याच जणांनी मी अर्धी मिशी काढल्याबद्दल मला नांवे ठेवली. पण मला माझ्या क्रिकेटवेडेपणाचा खूप अभिमान होता आणि आहे. तरी देखील मी सिडनी डोळ्यासमोर असताना पैज लावण्याची चूक केली.म्हणून खूप विचारांतीच मी अर्धश्मश्रूमुंडन केलय’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here