Home औरंगाबाद दारूड्यांमुळे धार्मिक स्थळाची विटंबना , दारू दुकान त्वरित हटवण्याची बहुजन समाज पक्षाची...

दारूड्यांमुळे धार्मिक स्थळाची विटंबना , दारू दुकान त्वरित हटवण्याची बहुजन समाज पक्षाची मागणी

897
0

निळ्या झेंड्याचा अपमान ,धार्मिक भावना दुखावल्याने महेंद्र जयस्वाल यांच्यावर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करा – किशोरभाई खिल्लारे

औरंगाबाद : येथील मुकुंदवाडी या गजबजलेल्या आणि नागरी वस्तीतच महेंद्र जयस्वाल यांचे दारूचे दुकान आहे. सदरील ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक आहे. तसेच नजीकच बुद्ध विहाराची नियोजित जागा आहे. या ठिकाणी रहिवाश्यांनी ओट्यावर निळा झेंडा ठेवला आहे. पण याच्या बाजूलाच
महेंद्र जयस्वाल यांचे देशी दारूचे दुकान थाटले गेले आहे. यामुळे दारुडे सदरील ठिकाणीच मद्यपान करतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच दारुड्यांची गर्दी पाहावयास मिळते. तर या परिसराच्या आसपासच भाजी मंडई आहे. दरम्यान या ठिकाणी महिलांचा आणि मुलींचा आवास असतो. पण रात्रीच्या वेळी या दारूड्यांकडून महिलांनाही त्रास दिला जातो. त्यामुळे महिलांना येथे असुरक्षित असल्याची भावना निर्माण होत आहे. तर काही मद्यप्रेमी झेंड्याजवळच बसून व्यसन करतात. तर काहीवेळा याचठिकाणी लघुशंका हि केली जाते. यामुळे येथील नागरिकांच्या अस्मितेचा अनादर होत असल्याची तक्रार बहुजन समाज पार्टी पक्षाचे जिल्हा प्रभारी किशोरभाई खिल्लारे यांनी राज्य उत्पादक शुल्क विभागाला केली आहे.

दरम्यान धार्मिक स्थानाची विटंबना होत असल्याने येथील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच नागरिकांत रोष निर्माण झाल्याचेही किशोरभाई खिल्लारे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थापनीयदृष्ट्या समस्या उद्भवू शकण्याची श्यक्यताही खिल्लारे यांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे महेंद्र जयस्वाल यांच्या दारू दुकानावर त्वरित कारवाई करण्यात यावी. तसेच निळ्या झेंड्याची विटंबना केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत जयस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी किशोरभाई खिल्लारे यांनी केली आहे. तसेच या दुकानाचे अंतर या भागापासून दूर असण्याची मागणीही खिल्लारे यांनी केली आहे.अन्यथा येथील जनसमुदायासह प्रशासनाच्या नाकी नऊ येतील अश्या स्वरूपात तीव्र स्वरूपाचे आंदोलन राज्य उत्पादक शुल्क विरोधात करण्यात येईल. असा गंभीर इशाराही किशोरभाई खिल्लारे यांनी दिला आहे.

किशोरभाई खिल्लारे {बहुजन समाज पक्ष}

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here