Home क्राइम संतापजनक : अल्पवयीन मुलीवर 29 जणांचा सामूहिक बलात्कार, व्हिडिओ बनवून केले ब्लॅकमेल

संतापजनक : अल्पवयीन मुलीवर 29 जणांचा सामूहिक बलात्कार, व्हिडिओ बनवून केले ब्लॅकमेल

13172
0
  • ठळक मुद्दे
  • 29 लोकांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला
  • मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
  • आतापर्यंत 26 आरोपींना पोलिसांनी केली अटक

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी मुंबईला लागून असलेल्या डोंबिवली परिसरातून क्रौर्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीने 29 लोकांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा आरोप आहे की, गेल्या 8 महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींनी तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला.

मुलीच्या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई केली
मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मुलीने सांगितले आहे की जानेवारी 2021 ते 22 सप्टेंबर 2021 पर्यंत एकूण 29 लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत 24 जणांना अटक केली आणि 2 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. मुलीने बलात्काराची ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

बलात्काराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केला
असे सांगितले जात आहे की पीडितेचा मित्र असलेल्या एका आरोपीने जानेवारी महिन्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता आणि या घटनेचा व्हिडिओ देखील शूट केला होता. यानंतर हा व्हिडिओ इतर आरोपींपर्यंत पोहोचला, ज्यांनी तिला ब्लॅकमेल केले आणि वारंवार मारहाण केली आणि तिच्यावर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, 7 जणांनी 3 दिवसांपूर्वी मुलीवर सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेचे गांभीर्य पाहता या प्रकरणाच्या तपासासाठी महिला पोलिसांच्या देखरेखीखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे.

पोलिसांनी या कलमांखाली गुन्हा दाखल केला
अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे म्हणाले, ‘आरोपींवर सामूहिक बलात्कार आणि पॉक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेंस अॅक्ट) चे कलम लावण्यात आले आहेत. एसीपी सोनाली डोळे यांची या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि डीसीपी सचिन गुंजाळ आणि मी या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवू. पीडितेला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here