Home अहमदाबाद आज आयपीएल उद्घाटन सोहळा , अनेक बॉलीवूड स्टार परफॉर्म करणार

आज आयपीएल उद्घाटन सोहळा , अनेक बॉलीवूड स्टार परफॉर्म करणार

273
0

चेन्नई-गुजरात सामना कधी-कुठे होणार?

अहमदाबाद :आयपीएलच्या १६व्या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्याला आज संध्याकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये तमन्ना भाटिया आणि अरिजित सिंग आणि रश्मिका मंदानासारखे अनेक बॉलीवूड स्टार परफॉर्म करणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना चारवेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पहिल्याच सामन्यात हार्दिक पंड्या आणि अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसमोर असणार . या सामन्याला रात्री साडेसातला सुरुवात होईल. या अगोदर आयपीएलची उद्घाटन पार पडेल.


धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नईला चार वेळा चॅम्पियन बनवले आहे. त्याचवेळी हार्दिकने पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवत गेल्या वर्षी गुजरातला चॅम्पियन बनवले होते. सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा होणार आहे. या दरम्यान अनेक बॉलीवूड स्टार्स आपली कला दाखवणार आहेत . आयपीएल मध्ये,गायक अरिजित सिंग आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया या कार्यक्रमात दिसणार आहे.


आयपीएलने बुधवारी (२९ मार्च) उद्घाटन समारंभात तमन्ना भाटिया सहभागी होणार असल्याची माहिती देणारे ट्विट केले. आयपीएलने लिहिले, “टाटा आयपीएल उद्घाटन समारंभात तमन्नासोबत सामील व्हा. आम्ही जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सर्वात मोठा क्रिकेट महोत्सव साजरा करणार आहे ”३१ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहितीही आयपीएलने दिली आहे.

त्यानंतर सात वाजता सीएसके आणि जीटी सामन्याची नाणेफेक होईल. त्यानंतर साडेसात वाजल्यापासून पहिला सामना खेळवला जाईल. उद्घाटन समारंभ आणि सामना स्टार स्पोर्ट्स इंडियावर बघता येणार . त्याच वेळी, ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अँप आणि वेबसाइटवर होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here