Home क्राइम एकाच वेळीस तिघांनी आत्महत्या केली…!

एकाच वेळीस तिघांनी आत्महत्या केली…!

501
0

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : लोणी काळभोर येथे तीन वेगवेगळ्या घटनांत एका १७ वर्षाच्या मुलीसह तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. कदमवाकवस्ती, कोरेगाव मुळ व कुंजीरवाडी या तीन गावात एकाच दिवसात या घटना घडली आहे.भावना जितन सोलंकी (वय १७, रा.घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती ), अभिषेक आनंदा गायकवाड (वय १९, रा. कोरेगाव मुळ ) व गुलाब विष्णू आंबेकर (वय ४८, रा.कुंजीरवाडी) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.तिघांच्याही आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.भावना सोलंकी हिचा विवाह नुकताच ठरला होता. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भावना दिवसभर, तिच्या भावी पतीशी मोबाईलवरुन बोलत होती.

दुपारी ४ च्या सुमारास आराम करण्याच्या नावाखाली ती खोलीत गेली. बराच वेळ बाहेर येत नसल्याने खोलीचा दरवाजा उघडला असता, घऱाच्या छताला ओढणीच्या साहाय्याने तिने गळफास घेतल्याचे आढळुन आले. नातेवाईकांनी भावनास पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात नेले. परंतू उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाला आहे .कुंजीरवाडी येथे गुलाब आंबेकर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन, आत्महत्या केल्याचा प्रकार दुपारी ४.३० च्या सुमारांस उघडकीस आला. अविवाहीत असलेले आंबेकर हे गेले कांही वर्षापासुन आजारी होते. तसेच त्यांना काही दिवसापुर्वीच अर्धांगवायूचा झटकाही येऊन गेला होता. तसेच कोरेगावमुळ येथील तिसऱ्या घटनेत अभिषेक गायकवाड या तरुणाने दुपारच्या वेळी घरी कोणी नसताना राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.लोणी काळभोर पोलीस आत्महत्याच कारण काय असेल याचा शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here