Home औरंगाबाद संस्थाचालकाच्या मुलाचे अपहरण ; वीस लाखांची खंडणी मागणारे अटकेत

संस्थाचालकाच्या मुलाचे अपहरण ; वीस लाखांची खंडणी मागणारे अटकेत

14652
0

अपहरणकर्त्याच्या तावडीतून बालकाला सुखरूप सोडवून आरोपीच्या मुसक्या आवळणाऱ्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत व त्यांच्या टीमचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

औरंगाबाद ; वाळुज एमआयडीसी भागातील एका संस्थाचालकाच्या मुलाचे अपहरण करून वीस लाखाची खंडणी मागणाऱ्या खंडणीखोराला पोलिसांनी अटक केली. संतोष रमेश सनान्से (वय २९, रा. उंडणगाव, ता. सिल्लोड) असे आरोपीचे नाव आहे. या खंडणीखोराच्या तावडीतून मुलाला पोलिसांनी सुखरूप सोडून घेतले. ही घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी वाळूज भागात सनराइज् इंग्लिश स्कूल आहे. या संस्थाचालकाच्या आठ वर्षाच्या मुलाचे याच संस्थाचालकांच्या इमारतीमध्ये भाड्याने राहत असलेल्या भाडेकरूने अपहरण केले होते. अपहरणानंतर बालकाच्या आईला फोन करून वीस लाखाची खंडणीमागितली होती. आपल्या मुलाचे अपहरण झाल्याने त्या महिलेने याची माहिती पोलिसांना दिली‌. पोलिसांना माहिती तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. फोनवर कुठलाही संशय न येता पैसे देण्याचे कबूल केले. पैसे देण्याच्या बहाण्याने त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले व त्या मुलाला सुखरूप सोडून घेतले. दरम्यान या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त निखील गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सराफ यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कर्जबाजारीमुळे केले अपहरण

अपहरणकर्ता हा संस्थाचालकांच्या इमारतीमध्ये भाड्याने राहत होता. तो कर्जबाजारी झाला. डोक्यावरचे कर्ज फेडण्यासाठी त्याने संस्थाचालकांच्या आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागितली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here