Home औरंगाबाद औरंगाबादेत बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची हत्या ; कोपऱ्यापासून हात तोडला

औरंगाबादेत बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची हत्या ; कोपऱ्यापासून हात तोडला

15143
0

नगरच्या पाथर्डी येथून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादेत आलेल्या एका २३ वर्षीय तरूणाची कब्रस्तानमध्ये नेऊन निर्घृण हत्या करण्यात आली.

औरंगाबाद : नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून बँकेच्या परीक्षेसाठी शहरात आलेल्या एका २३ वर्षीय तरूणाची कब्रस्तानमध्ये नेऊन निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास या तरुणाची चिकलठाणा भागातील आयऑन डिजिटल या केंद्रावर परीक्षा होती. विकास देवीचंद चव्हाण (२३, रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे त्याचा हात कोपऱ्यापासून तोडण्यात आला आहे.
सकाळी लवकर परीक्षा असल्याने विकास हा रात्रीच शहरात आला असावा त्यामुळे लुटमारीतून विकासचा खून झाला का? किंवा त्याचा कुणाशी वाद होता का याबाबत सिटी चौक पोलीस शोध घेत आहे. विशेष म्हणजे विकासचा कोपऱ्यापासून हात तोडण्यात आला असून अजूनपर्यंत छाटून टाकलेला हात पोलिसांना मिळालेला नाही. घटनास्थळी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह सिटी चौक तसेच गुन्हे शाखा पोलिसांनी धाव घेत पाहणी केली.

मयत विकास चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here