Home Uncategorized महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दै.मराठवाडा साथी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांच्या नावांची...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दै.मराठवाडा साथी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा

424
0

लवकरच शानदार कार्यक्रमात होणार पुरस्कारांचे वितरण

औरंगाबाद । महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व दै.मराठवाडा साथीच्या वतीने देण्यात येणार्‍या सकारात्मक लेखन या विषयावरील राज्यस्तरीय पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा आज दर्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. राज्यस्तरीय पुरस्कारांसोबत प्रत्येक विभागातून तीन पुरस्कार व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहेत. लवकरच या पुरस्कारांचे वितरण एका शानदार कार्यक्रमात औरंगाबाद येथे होणार आहे. दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार देण्यात येत आहेत.
दर्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आणि दै.मराठवाडा साथीच्या वतीने देण्यात येणार्‍या प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार देण्यात येत आहेत. यासाठी संयोजकांच्या वतीने सकारात्मक लेखन हा विषय पुरस्कारासाठी ठेवण्यात आला होता. प्रत्येक विभागातून मोठ्या प्रमाणात स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या होत्या. निवड समितीने पुरस्कारांसाठी आलेल्या साहित्यांचे परिक्षण करून आज पुरस्कार विजेत्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. पुरस्कारप्राप्त सर्वांचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे, दै.मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे यांनी अभिनंदन केले आहे.

असे आहेत पुरस्कार विजेते…
राजेश टोळ्ये (कार्यकारी संपादक -दै.सुराज्य, सोलापूर), शिवाजी शिर्के (संपादक -दै.नगर सह्याद्री, अहमदनगर), दत्तात्रय देशमुख (जिल्हा प्रतिनिधी – दै.सकाळ) यांना राज्यस्तरीय पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत. तर मराठवाडा विभागासाठी दिव्य मराठीचे औरंगाबाद प्रतिनिधी संतोष देशमुख, परतूरचे दिव्य मराठी प्रतिनिधी आशिष गारकर, नांदेडचे दै.पुढारीचे प्रतिनिधी विलास गुंडावार यांना जाहिर करण्यात आले आहेत. याच विभागातून प्रोत्साहनपर दै.पुढारीचे परळी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण वाकडे, देशोन्नतीचे परतूर प्रतिनिधी बालाजी ढोबळे, दै.पुढारी औरंगाबादचे राहुल जांगडे, वैजापूर दिव्य मराठीचे शांताराम मगर, बदनापूर दै.सकाळचे आनंद इंदाणी, घनसावंगी दै.पुढारीचे प्रतिनिधी अविनाश घोगरे, सा.जनाई नगरीचे संपादक भागवत जलाले, मुक्त पत्रकार तथा लेखक सचिन स्वामी यांना जाहिर करण्यात आले आहेत. विदर्भ विभागासाठीचे पुरस्कार मीडिया वॉच अमरावतीचे संपादक अविनाश दुधे, देशोन्नतीचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे, दै.लोकमतच्या अकोला आवृत्तीचे वरिष्ठ संपादक विवेक चांदूरकर यांना जाहिर करण्यात आले आहेत. खान्देश विभागासाठी अ‍ॅग्रोवर्ल्ड जळगावचे संपादक शैलेंद्र चव्हाण, महाराष्ट्र टाईम्सचे खान्देश ब्युरो चिफ प्रविण चौधरी, दै.जनशक्ती, जळगावचे कार्यकारी संपादक डॉ.युवराज परदेशी यांना घोषीत करण्यात येत असून, उर्वरित महाराष्ट्रासाठीचे पुरस्कार टिव्ही 9 च्या पुण्याच्या विशेष प्रतिनिधी अश्विनी सातव, पुणे पुढारीचे विशेष प्रतिनिधी दिगंबर दराडे, थोडक्यात न्यूज कोल्हापूरचे कृष्णा वरपे यांना जाहिर करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here