Home अभिव्यक्ती राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट व दै.मराठवाडा साथी आयोजित द ग्रेट टॅलेन्ट शो ला...

राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट व दै.मराठवाडा साथी आयोजित द ग्रेट टॅलेन्ट शो ला उदंड प्रतिसाद

लपलेल्या कलेला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळालं –दत्तात्रय काळे

924
0

परळी । राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट व दै.मराठवाडा साथीच्या वतीते परळीत राज्यस्तरीय द टॅलेन्ट हन्ट शोचे गेल्या काही दिवसांपासून आयोजन करण्यात येत आहे. पुढील आणखी काही दिवस या स्पर्धां लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर येथे घेतल्या जाणार असून, दि.०९ नोव्हेंबर रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. दि.०४ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी झाले आहेत. गीत-संगित, गायन, कला, गणित, विज्ञान, कलाकुसार, मेहंदी आदीं कलांसह आपल्यात असलेल्या प्रत्येक कलेला येथे आलेला स्पर्धक वाट मोकळी करून देत आहे. राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यस्तरीय स्पर्धांचे परळीत आयोजन करण्यात आले आहे.

तीसऱ्या दिवशीच्या स्पर्धेला मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. उपस्थितांच्या हस्ते माता सरस्वती आणि नटराजाच्या मुर्तीची पुजा व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून दै.मराठवाडा साथीचे सरव्यवस्थापक ओमप्रकाश अप्पा बुरांडे, वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, पीसीएन न्युजचे संभाजी मुंडे, वैशाली रूईकर, सिने अभिनेते नंदकिशोर चिखले, राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव बद्रीनारायण बाहेती, संचालक सौ.प्रेमा बाहेती, पोदार स्कुलचे प्राचार्य डॉ.बी.पी.सिंग, प्रशासक धिरज बाहेती, बचपन स्कुलच्या प्राचार्या सौ.दीपा बाहेती यांच्यासह स्पर्धेच्या परिक्षक प्रा.सौ.अर्चना चव्हाण, प्रा.सौ.विरश्री आर्या, सौ.सोनाली ठक्कर, सौ.मधु सिंह आदींची उपस्थिती होती. शुभारंभानंतर आपल्या विवेचनात बोलतांना दै..मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे म्हणाले की  या स्पर्धांच्या माध्यमातून राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावलील कलाकार तयार होणार आहेत व समाजाच्या समोर येणार आहेत. लोकगीत, नाट्य, संगीत, गायन, अभिनय, मेहंदी, गोंधळ, जादूचे प्रयोग अशा असंख्य कला समाजाच्या समोर येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनामुळे कलाकारांना कुठेही व्यासपीठ उपलब्ध नव्हते. द ग्रेट टॅलेंट शोच्या माध्यमातून ही राज्यस्तरीय संधी परळीत राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट व दै.मराठवाडा साथीने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे एक सकारात्मक उर्जा प्रत्येकात निर्माण होत असून, अगदी ग्रामिण भागांसह ज्यांनी याअगोदर काही मालिकांमध्ये व वेब सिरिजमध्ये काम केलेले आहे अशाही कलाकारांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेणे ही खूप मोठी उपलब्धी आहे.

राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पोदार लर्न स्कुल व बचपन प्ले स्कुलच्या सर्व स्टाफने या स्पर्धांचे आयोजनात पुढाकार घेतला आहे. पोदार स्कुलचे प्रशासक धीरज बाहेती, प्राचार्य बी.पी.सिंग, बचपन प्ले स्कुलच्या प्राचार्या दीपा बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व त्यांची टीम या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणावर नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. कलाकारांना त्यांच्या कलांचे सादरीकरण करण्यासाठी कुठेही व्यासपीठ उपलब्ध नसतांना राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट व दै.मराठवाडा साथीने परळीत राज्यस्तरीय रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून या व्यासपीठावर आलेल्या प्रत्येकाने उपस्थित सर्वांची मनं तर जिंकलीच आहेत, परंतू हे कार्यक्रम दै.मराठवाडा साथीच्या पीसीएन न्युजच्या चॅनल क्रमांक ६५१ वर थेट प्रक्षेपीत करण्यात येत असल्यामुळे सर्वत्र या कार्यक्रमांची चर्चा आहे. बाल-गोपाळांपासून, तरूण आणि वृध्दही या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. महिला आणि मुलींचा सहभाग प्रत्येकच कलाकुसरीत लक्षणीय असाच आहे.

राज्यभरातून आलेल्य स्पर्धक गाजवतायेत कलेचं व्यासपीठ


गायन, नृत्य, गोंधळ, अभिनय, वादन, मेहंदी, जादूचे प्रयोग होत आहेत सादर
कलाकार अलौकीक कलेने जिंकत आहेत श्रोत्यांची मनं
मराठवाडा साथीच्या पीसीएन न्युज चॅनलवर होतंय थेट प्रक्षेपण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here