Home लाइफस्टाइल हिवाळ्यात ही फळ खाल्लीच पाहिजे …!

हिवाळ्यात ही फळ खाल्लीच पाहिजे …!

83
0


मराठवाडा साथी
औरंगाबाद : महाराष्ट्रात हिवाळ्यात गुलाबी थंडीचे वातावरणातील बदल असल्याप्रमाणे शरीरात देखील काही बदल जाणवतात. या वेळी पौष्टिक आहार हाच उत्तम पर्याय असतो. दिवसांमध्ये आहारासोबत फळाचे सेवन करणं देखील तेवढंच गरजेचे आहे .

पपई
हिवाळ्यातील आदर्श फळ म्हणजे पपई. थंड वातावरणात तुमच्या शरीरातील उष्णता सांभाळून ठेवण्यासाठी पपईचा खूप फायदा होतो. थंडीशी दोन हात करण्यासाठी पपई जरूर खावेत.

संत्री
संत्री हे बाजारात आपल्याला दोन ऋतूमध्ये दिसतात. पण हिवाळ्यात येणारी संत्री ही खास करून गोड असतात. संत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.

स्ट्रॉबेरी
हिवाळ्यात हमखास मिळणारं आणि खाल्ल जाणारं फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी फक्त दिसायलाच सुंदर असते असं नाही तर त्याचे फायदे देखील खूप आहे. स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकार शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते आणि तुमची त्वचा अधिक सुंदर म्हणजे तरूण दिसण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

सिताफळ
हिवाळ्यातील सिताफळ देखील अत्यंत महत्वाचं फळ आहे. अनेकांना यामध्ये खूप बिया असल्यामुळे खायला कंटाळा करतात. पण तुम्ही एकदा या फळाचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हाला अंदाज येईल की, या फळाचं किती महत्व आहे. सिताफळ हे लहान मुलांसाठी अत्यंत महत्वाच फळ आहे. वजन वाढण्याकरता हे फळ खाल्लं जातं आहे .

अंजीर
अनेकदा अंजीरचा वापर सुक्यामेव्यात केला जातो. मात्र हिवाळ्यात अंजीर हे फळ देखील अत्यंत गुणकारी आहे. सुक्यामेव्यातील अंजीर आपण वर्षभर खावू शकतो. पण ताजं अंजीर अत्यंत फायदेशीर आहे. अंजीर हे फळ पुरूषांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here