Home मनोरंजन नेहमी आपल्या विधानातून चर्चेत असणाऱ्या कंगनाचे वादग्रस्त ट्विट: कंगना चे ट्विट आणि...

नेहमी आपल्या विधानातून चर्चेत असणाऱ्या कंगनाचे वादग्रस्त ट्विट: कंगना चे ट्विट आणि अमिताभ बच्चन व टायगर श्राफ धारेवर

388
0

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे सातत्याने चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता.परंतु याच दिवशी अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांच्या भूमिका असलेला ‘गणपत’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कंगना ने तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. यामुळे कदाचित कंगना रिस्क न घेता मागे आल्याची चर्चा रंगली होती मात्र अखेर आता कंगनाने या प्रकरणी भाष्य करत ‘गणपत’च्या निर्मात्यांवर सडेतोड टीका केली आहे.
कंगना रणौतने नुकतंच ट्विटरवर सलग तीन ट्वीट केले आहेत. या ट्वीटद्वारे तिने अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफ यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी कंगना म्हणाली, “मी जेव्हा माझा आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तारीख शोधत होते, तेव्हा मला जाणवले की यंदा अनेक तारखा उपलब्ध आहेत. कदाचित हिंदी चित्रपटसृष्टी अडचणीत असल्यामुळे पण मी माझ्या पोस्ट प्रॉडक्शनचा विचार करुन २० ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली.”
मला असं वाटतंय की बॉलीवूड वर माफियाचा असर झाला. पण आता मात्र मी ‘इमर्जन्सी’चा ट्रेलर आणि त्याच्या प्रदर्शनाची तारीख महिनाभर आधीच जाहीर करेन. जर संपूर्ण वर्ष हे रिकामे असेल तर मग विनाकारण एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित का करायचेत? ही सिनेसृष्टीची वाईट अवस्था आहे. तरीही लोकं इतका मुर्खपणा करतात अशे ट्विट करत कंगनाने सडेतोड टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here