Home Uncategorized ए आर रहमान यांचं वक्तव्य चर्चेत म्हणाले ऑस्करसाठी भारतातून चुकीचे चित्रपट.

ए आर रहमान यांचं वक्तव्य चर्चेत म्हणाले ऑस्करसाठी भारतातून चुकीचे चित्रपट.

363
0

यंदाच्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका पाहायला मिळाला. RRR चित्रपटातील नाटू-नाटू आणि डॉक्युमेंटरी फिल्म द एलिफंट व्हिस्पर्स ने ऑस्कर जिंकत इतिहास रचला. अजूनही सगळीकडे या पुरस्कार विजेत्यांचं जगभरात कौतुक होत आहे. दरम्यान, दोन ऑस्कर जिंकलेल्या ए आर रहमान यांची मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. त्यात त्यांनी भारतीय चित्रपट ऑस्करमध्ये पाठवण्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.दोन ऑस्कर जिंकलेल्या ए आर रहमान यांची मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. त्यात त्यांनी भारतीय चित्रपट ऑस्करमध्ये पाठवण्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
या मुलाखतीत एल सुब्रमण्यम यांनी एआर रहमान यांना अनेक संगीतकार आणि ऑर्केस्ट्राबरोबर म्युझिक तयार करण्याची जुनी पद्धत कशी बददली हे विचारलं. त्यावर रहमान म्हणाले, ‘हे टेक्नॉलॉजीच्या विकासामुळे झाले आहे. याआधी एका चित्रपटासाठी फक्त आठ ट्रॅक होते, पण मी जिंगल बॅकग्राऊंडमधून आलो होतो, त्यामुळे माझ्याकडे १६ ट्रॅक होते आणि मी त्यात बरंच काही करू शकत होतो.’ते पुढे म्हणाले कि, ‘त्या काळी ऑर्केस्ट्रा महाग होता, पण सर्व मोठी वाद्ये लहान झाली. यामुळे मला प्रयोग करायला आणि अयशस्वी होण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. माझे अपयश कोणालाच माहीत नाही, लोकांनी फक्त माझे यश पाहिले आहे, कारण हे सर्व स्टुडिओमध्ये घडलं होतं. घरच्या स्टुडिओमुळे मला ते स्वातंत्र्य मिळालं.’ऑस्करमध्ये निवड होणाऱ्या चित्रपटांबद्दल एआर रहमान म्हणाले की, ‘कधीकधी मी पाहतो की आपले चित्रपट ऑस्करपर्यंत जातात, पण पुरस्कार मिळत नाहीत.’ते पुढे म्हणाले, ‘ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवले जात आहेत. असं अजिबात करू नये असं मला वाटतं. आपण समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे. इथे काय चाललं आहे, हे पाहण्यासाठी मला पाश्चिमात्य देशाप्रमाणे विचार करावा लागेल.”आपल्या जागी राहून आपल्या पद्धतीने विचार केला पाहिजे, असं रहमान यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे. ही मुलाखत आताची नसून जुनी म्हणजेच जानेवारी महिन्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.S.S. राजामौली यांच्या RRR मधील नातू नातू या तेलगू गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर जिंकल्यानंतर काही दिवसांनी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. रहमान यांनी २००९ मध्ये स्लमडॉग मिलेनियरमधील जय हो या गाण्यासाठी त्याच श्रेणीत ऑस्कर जिंकला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here