Home Uncategorized परळी तहसिल कार्यालयात ग्राहक दिन साजरा

परळी तहसिल कार्यालयात ग्राहक दिन साजरा

552
0

परळी वैजनाथ

गुरूवारी परळीच्या तहसिल कार्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला. दुपारी १ वाजता मुख्य सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे तर प्रमुख अतिथी म्हणून नव्याने रूजू झालेले तहसिलदार सुरेश शेजुळ, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य सुधीर फुलारी, तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष चंद्रकांत समशेट्टे, सौ.चेतना गौरशेटे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस नायब तहसिलदार बी.एल.रूपनर यांनी मांडलेल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहीती दिली.  महाराष्ट्र ग्राहक पंचायत द्वारा माहिती व कार्यदिशा या पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तहसिलदार सुरेश शेजुळ व सुधीर फुलारी यांनी महाराष्ट्र ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक दिनाचे महत्व पटवून देत कायद्यात असलेल्या तरतुदींची संपूर्ण माहीती दिली. उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे म्हणाल्या की, ग्राहक संरक्षण कायद्याचे सर्वांनी अनुपालन करावे व खरेदी विक्री करतांना सतर्कता बाळगावी असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नायब तहसिलदार बी.एल.रूपनर, के.के.पवार, कालीदास बळवंत यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here