Home मनोरंजन तीन महिलांची कहाणी असणारा “त्रिभंगा “चा टीजर आउट

तीन महिलांची कहाणी असणारा “त्रिभंगा “चा टीजर आउट

105
0

अनोख्या अंदाजात दिसणार अभिनेत्री काजोल

मुंबई : ‘त्रिभंगा’ या चित्रपटाचा टीजर काजोलने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये काजोल एका वेगळ्या अंदाजात दिसून येत आहे. टीझरसोबतच काजोलने 15 जानेवारीला नेटफ्लिक्सवर सिनेमाच्या रिलीजचीही माहिती दिली आहे. अजय देवगनच्या प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा रेणुका शहाणे यांनी लिहिली असून ती या चित्रपटात दिग्दर्शनही करत आहे. काजोल व्यतिरिक्त तन्वी आझमी आणि मिथिला पालकरसुद्धा या चित्रपटाचा भाग आहेत. चित्रपट पूर्णपणे महिलाभिमुख आहे.

या चित्रपटात तीन महिलांची कहाणी असून यावरूनच चित्रपटाचे नाव “त्रिभंगा ” ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तिन बायकांची स्वप्ने, त्यांची जीवन जगण्याची स्वतःची पद्धत याच्या अवतीभोवती हि कहाणी फिरते.बर्‍याच दिवसानंतर काजोल एका चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्येही या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.

या तारखेला होणार चित्रपट रिलीज :
१५ जानेवारीला “Netflix “वर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here