Home क्रीडा कडकनाथ कोंबड्यांची विक्री आता कूल कॅप्टन ‘धोनी’ करणार

कडकनाथ कोंबड्यांची विक्री आता कूल कॅप्टन ‘धोनी’ करणार

952
0

मुंबई : १५ ऑगस्ट २०१९ मध्ये धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतर इंडियन टीमचा कूल कॅप्टन आता सेंद्रीय शेतीकडे वळला आहे. मध्यंतरी धोनीचे शेती करतानाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे धोनीची टीम आता डेअरी क्षेत्रातही उतरली आहे. सहीवाल जातीच्या गाई धोनी टीमने विकत घेतल्या आहेत.तसेच मत्सोद्योगात, बदक पालन आणि पोल्ट्री फार्ममध्ये देखील धोनीने गुंतवणूक केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता महेंद्रसिंह धोनी कडकनाथ कोंबड्यांची विक्री करेल. धोनीने मध्य प्रदेशातील झाबुआच्या कडकनाथच्या २ हजार पिल्लांसाठी अग्रिम मोबदल्यासोबत झाबुआच्या आदिवासी शेतकऱ्याला ऑर्डरही दिली आहे.

झाबुआ जिल्ह्यातील थांदला खेड्यातील रहिवासी शेतकरी विनोद मेधा, रांचीतील धोनीच्या टीमला २००० कडकनाथ पिल्लांची पुरवठा करण्याची १५ डिसेंबरची मुदत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. विनोद यांना आशा आहे की, जेव्हा ते रांची येथे कडकनाथ पिल्लांची डिलिव्हरी देण्यासाठी जातील तेव्हा ते धोनीसारख्या व्यक्तीला भेटतील.

दरम्यान धोनीची टीम चेन्नई यंदाच्या आयपीएल मध्ये चांगली खेळी दाखवू शकली नाही. धोनीच्या चेन्नई टीमला माध्यातूनच परतावे लागले. यंदाच्या आयपीएल या मध्ये धोनीच्या टीमला चांगलाच संघर्ष करावा लागत होता. २०२० चे हे आयपीएल वीजेपद मुंबईने पटकावले आहे. मागील वर्षी देखील मुंबईनेच विजेतेपत मिळवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here