Home मनोरंजन अनुष्का भडकली मीडियावर !

अनुष्का भडकली मीडियावर !

147
0

पती विराटसह खाजगी फोटो क्लिक केल्यामुळे अनुष्का शर्मा संतापली.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लवकरच आई वडील होणार आहेत. गरोदरपणात अनुष्कासोबत वेळ घालता यावा यासाठी पती विराट कोहली कसोटी मॅच सोडून आला आहे. ते दोघे सध्या एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. पण त्यांच्या या वेळेमध्येच फोटोग्राफर्सनी त्यांचा पिच्छा सोडलेला नाही. यावेळीच फोटोग्राफर्सनी त्यांना स्पॉट करत एक फोटो क्लीक केला. आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.यावरूनच अनुष्का मीडियावर भडकली आहे. याच कृत्यावर अनुष्काने नाराजी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी नाराजी व्यक्त करत अनुष्का शर्माने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत फोटोग्राफरला खडे बोल सुनावले आहेत. तिने फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, ‘फोटोग्राफर आणि पब्लिकेशन्सला अनेकदा विनंती केल्यानंतरही त्यांनी आमच्या प्रायव्हसीमध्ये दखल देणं सुरुच ठेवलं आहे. हे सर्व आताच थांबवा.’असे तिने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here