Home शिक्षण … येथे मुलींना शाळेत येण्याचे मिळणार “100” रुपये !

… येथे मुलींना शाळेत येण्याचे मिळणार “100” रुपये !

51
0

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आसाम सरकारची स्पेशल ऑफर

आसाम : शाळेत वर्गात बसल्याबद्दल मुलींना दररोज 100 रुपये देण्याची योजना आसाम सरकारने सुरू केली आहे, अशी माहिती आसामचे शिक्षणमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली आहे. जानेवारी २०२१ च्या शेवटापर्यंत प्रत्यक्ष दररोज100 रुपये द्यायला सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं.वेगवेगळ्या कारणांनी मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मुलींचे प्रमाण वाढावे यासाठी आसाम सरकारने हि वेगळी शक्कल लढवली आहे.

12 वी फर्स्ट क्लास विद्यार्थिनींना मिळणार दुचाकी :

आसाम सरकारच्या प्रज्ञान भारती योजनेअंतर्गत 12 वीच्या परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना 22 हजार दुचाकी वाहनं देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी 144.30 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. 2018,19 मध्ये ज्या विद्यार्थिनींना 12 वी बोर्डाच्या परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवला आहे त्यांनाही सरकार दुचाकी देणार आहे.

पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थिनींना मिळणार 2000

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या बँक खात्यांत जानेवारीअखेर पर्यंत अनुक्रमे 1,500 रुपये व 2,000 रुपये जमा केले जातील. दरम्यान आसाममध्ये विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळ सुरु होणार आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्याचा हा फंडा मानला जात आहे. पण यात विद्यार्थिनींचे प्रमाण वाढण्याचा निकाल नक्कीच शैक्षणिक आशा ठरू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here