Home इतर नव दाम्पत्याचा पाण्यात बुडून मृत्यू…!

नव दाम्पत्याचा पाण्यात बुडून मृत्यू…!

136
0

मराठवाडा साथी न्यूज

धुळे : पत्नी पाय घसरून विहिरीत पडली तिला वाचवितांना पतीनेही विहिरीत उडी टाकली मात्र दोघांनीही प्राण गमावले. बळसाणे येथे या नव दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाल्याने नजीकच्या परिसरात खळबळजनक वातावरणात निर्माण झाले आहे.

दरम्यान,रब्बी हंगाम सुरु असल्याने लक्ष्मण पंढरीनाथ रत्नपारखे (वय २७) हे पत्नी अंजूबाई लक्ष्मण रत्नपारखे (वय २२) यांच्यासोबत शेताचे काम करत असतांना अंजू विहिरीत पाणी आणण्यासाठी गेल्या असता त्यांचा तोल गेला आणि त्या विहिरीत पडल्या. हे पहाताच लक्ष्मण यांनी विहिरीत उडी मारली.मात्र,पाण्याची पातळी जास्त असल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाला या घटने संदर्भात माहिती देण्यात आली आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले.याप्रकरणी देविदास अभिमन सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीवरुन निजामपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here