Home कृषी जगभरातील ४९ देश कांद्यासाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून

जगभरातील ४९ देश कांद्यासाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून

227
0

जळगाव:साखर निर्यातीसारखे धोरण आखल्यास कांद्याचा प्रश्न सुटेल.जगभरातील तब्बल ४९ देश कांद्यासाठी भारतावर अवलंबून आहेत. यात सर्वात माेठा खरेदीदार असलेल्या बांगलादेशाचा वाटा २२ टक्के आहे. गेल्या वर्षी बांगलादेशने ५,१०,४०८ टन कांदा खरेदी केला हाेता. यंदा मात्र निर्यातीला या देशातील परकीय चलनाच्या मर्यादा असल्याने, शिवाय कांदा निर्यातीसाठी भारतात केंद्र सरकारचे साखर निर्यातीसारखे स्वतंत्र धोरण नसल्याने देशात कांद्याचे भाव कोसळले आहेत. सद्य:स्थितीत कांदा निर्यातीची भिस्त व्यापाऱ्यांवरच आहे. व्यापाऱ्यांकडे येणाऱ्या मागणीनुसार तो कांदा खरेदी करून निर्यात करतो. त्यामुळे धोरणाअभावी कांद्याचे भाव गडगडतात. या स्थितीत यंदा देशभर २० लाख टन कांदा निर्यातीअभावी पडून आहे , जगभर कांदा टंचाई असून भारताकडे मागणी हाेत आहे. परंतु, शासन यावर लक्ष न देता साखर निर्यातीवरच लक्ष केंद्रित करत आहे. साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज असताना शासनाने बंद कारखान्यांनाही निर्यातीचा काेटा देवून ६१ लाख टन साखर निर्यातीचे करार केले. तसे कांद्याच्या बाबतीत होत नाही.गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबरअखेरपर्यंत भारतातून ३१४७.२६ काेटींचा कांदा आखाती देश, आफ्रिया व युराेपातील ४९ देशांमध्ये निर्यात झाला. यावर्षी मलेशिया वगळता बहुतांश देशांत कांदा निर्यात थांबलेली आहे. त्यामुळे देशात भाव पडले. शासनाने याेग्य नियाेजन केल्यास देशातून २० लाख टन कांदा निर्यात हाेवू शकताे.गेल्या सहा वर्षांतील कांदा निर्यात:वर्ष – मे. टन काेटी रूपये २०१६-१७ २४,१५,७३९.०६ ३१०६.०८ २०१७-१८ १५,८८,९८५,७१ ३०८८.७९ २०१८-१९ २१,८३,७६६,४५ ३४६८.८३ २०१९-२० ११,४९,८९६.८५ २३२०.७० २०२०-२१ १५,७८,०१६.५९ २८२६.५० २०२१-२२ १५,३७,४९६.८९ ३४३२.१४
बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ इंडाेनेशिया, यूएई, कतार, व्हिएतनाम, कुवेत, सिंगापूर, साैदी अरेबिया या प्रमुुख देशांमध्ये भारतीय कांद्याला विशेष मागणी आहे. यासह एकूण ४९ देशांत गेल्या वर्षात १७ लाख टन कांद्याची निर्यात झाली हाेती. फिलिपाइन्समध्ये यंदा नेदरलँडहून येणाऱ्या कांद्याची निर्यात थांबल्याने अभूतपूर्व कांदा टंचाई आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जगभर कांदा उत्पादन घटले असता सुदैवाने भारतात उत्पादन वाढले आहे. त्यामुळे कांदा निर्यातीच्या प्रचंड संधी आहेत.यंदा देशात साखर उत्पादन घटून ३३० लाख टन होईल, असा अंदाज. यातील २७५ लाख टन देशात लागेल. ५५ लाख टन निर्यात होऊ शकते. मात्र, शासनाने ६१ लाख टन निर्यातीचे करार केले. साखरसम्राटांना खुश करण्यासाठी प्रथमच थेट कारखानदारांना निर्यातीचा काेटा दिला आहे.
निर्यात परवाने दिलेले अनेक बंद झाले आहे . १४९ कारखानदारांनी तर हे परवाने इतर कारखान्यांना देऊन नफा कमवला. यातून ६ लाख टन साखरेची टंचाई होऊन साखर महागू शकते.सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडले आहे. साखर निर्यातीसाठी जसे प्रयत्न झाले तसेच कांदा निर्यातीसाठीसुद्धा केले पाहिजेत. बांगलादेशात कांद्याची माेठी मागणी आहे. निर्यात सुरू केली तर लगेच कांद्याचे भाव वाढतील. निर्यातीमुळे मागणी व पुरवठ्याचा ताळमेळ साधला जाईल.’
असे विराेधी पक्षनेतेअजित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here