Home मनोरंजन चेहरा बघून ठरवले या अभिनेत्याला’व्यसनाधीन’;मिळाले मग हे उत्तर…!

चेहरा बघून ठरवले या अभिनेत्याला’व्यसनाधीन’;मिळाले मग हे उत्तर…!

96
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सेलिब्रिटीज ना ट्रोल करणे सध्या मोठ्या प्रमाणात वाढतच चालले आहे.नुकतेच अभिनेता आर माधवन अर्थात मॅडीलाही सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र,मॅडीने त्याच्या उत्तरातूनच ट्रोलकरणाऱ्या एका महिला डॉक्टर ची बोलती बंद केली आहे.

अभिनेता अमित साध याने मॅडीसोबत एक फोटोशेअर करत लिहिले होते की, ‘भाऊ… मॅडी सर… त्या ३० मिनिटांत तू मला पुन्हा एकदा प्रेरणा दिलीस… तुझ्यावर खूप प्रेम आहे.’ अमितच्या या ट्वीटवर अनुष्का नावाच्या एका यूझरने कंमेंट केली आणि त्यामध्ये लिहिले की,’कधी एकेकाळी मॅडी सर माझा सर्वोत्तम अभिनेता होता. पण जेव्हापासून माधवनला दारू आणि अमली पदार्थांमुळे स्वतःची कारकीर्द, आरोग्य आणि आयुष्य वाया घालवताना पाहिले ते फार निराशाजनक होते.जेव्हा त्याने RHTDM मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा तो एका उमलणाऱ्या कळीसारखा होता. पण आता त्याला पाहिले की त्याचा चेहरा आणि डोळे सर्व काही सांगून जातात..’

या डॉक्टर ची कंमेंट आर माधवनने बघितली.त्यानंतर त्यानेदेखील मजेशीर अंदाजात तिच्या ट्वीटला उत्तर दिले.त्याने त्याच्या ट्विट मध्ये लिहिले की, ‘ओह तर तू असा निष्कर्ष काढलास? मला तुझ्या रुग्णांची चिंता वाटते. मला वाटते तुला स्वतःलाच एका डॉक्टराचा सल्ला घेण्याची गरज आहे.’

विशेष म्हणजे मॅडीच्या या प्रतिक्रियेनंतर त्याच्या चाहत्यांनीही या ट्वीटवर मॅडीला पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here