Home क्राइम लोकल मधून ढकलून देत;केला हत्येचा प्रयत्न…!

लोकल मधून ढकलून देत;केला हत्येचा प्रयत्न…!

711
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी मुंबई : धावत्या लोकल ट्रेनमधून वाशी खाडी पुलावर एका २५ वर्षीय तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणी २२ डिसेंबर ला सकाळी वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळालगत जखमी अवस्थेत सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. प्राथमिक तपासात या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

या घटनेतील जखमी तरुणी टिटवाळा इथे राहत होती. रविवारी (२० डिसें.) संध्याकाळी ती पवई इथे आपल्या कामावर येण्यासाठी रवाना झाली परंतु त्यानंतर तिचा कुटुंबियांशीसंपर्क तुटला.त्यानंतर मंगळवारी पहाटे ही तरुणी वाशी खाडी पुलावर जखमी अवस्थेत मोटरमनच्या निदर्शनास आली होती.त्यानंतर रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या जवानाने जखमी तरुणीला तत्काळ वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान,तरुणीवर जे.जे.हॉस्पिलमध्ये उपचार सुरु असून अद्याप ती बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचे वाशी रेल्वे पोलिसांनी सांगितले.त्यामुळे घटना नेमकी कशी घडली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.फॉरेन्सिकच्या अहवालानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला की नाही हे स्पष्ट होणार असल्याचेही यावेळी पोलिसांनी सांगितले.या प्रकरणात अज्ञात व्यक्ती विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि बलात्कार या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here