Home आरोग्य एक कोरफड अनेक फायदे

एक कोरफड अनेक फायदे

93
0

कोरफडीच्या गरात सौंदर्य वाढवणारे अनेक घटक असतात. या गरामुळे शरीराच्या आतील आणि बाहेरील समस्या दूर व्हायला मदत होते. त्यामुळे कोरफडीचा गर पोटातूनही घेतला जातो. या गरात अँटी-बॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे तसेच यामध्ये व्हिटॅमिन बी १, बी २, बी ६, बी १२ मुबलक प्रमाणात असते.त्यामुळे त्वचा, केस, व इतर समस्या दूर करण्यासाठी याचा वापर करतात.

मुख्य म्हणजे कोरफड हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हिरव्या रंगाच्या काटेरी कोरफडीच्या आतमध्ये असलेला पांढऱ्या रंगाचा गर चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याची नैसर्गिक चमक वाटतेच, शिवाय चेहरा नितळ व्हायला मदत होते. जाणून घेऊया या घरगुती फेस माक्सविषयी-

कोरफडीचा गर आणि लिंबाचा रस
एका बाऊलमध्ये लिंबाचा रस आणि कोरफडीचा गर सम प्रमाणात घ्या. हे मिश्रण व्यवस्थित मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवा. चेहऱ्याला नैसर्गिक चमक येईल.

कोरफडीचा गर आणि मसूर डाळीचा फेसपॅक
चेहऱ्याची बंद झालेली छिद्रे पुन्हा उघडण्यासाठी मसूरचा फेस पॅकची मदत होते. यासाठी एका बाऊलमध्ये कोरफडीचा गर, १ चमचा मसूर डाळ पावडर आणि टोमॅटोचा रस घ्या. पेस्ट होईल एवढे पाणी मिसळा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावा. काही वेळाने चेहरा धुवा. यामुळे चेहरा एक्सफोलिएट होईल शिवाय चेहऱ्यावरील मृत त्वचाही निघून जायला मदत होईल.

कोरफडीचा गर आणि मध
मधामुळे चेहरा चमकदार होतो. मधासोबत हळदही वापरू शकता. हळदीचे औषधी गुणधर्म चेहऱ्यावरील अशुद्धी दूर करतात. २ चमचे कोरफडीच्या गरात १ चमचा मध आणि हळद मिसळा. हा फेस पॅक २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा, त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

कोरफड आणि कडुलिंब
चेहऱ्यावरील मुरुमं कडुलिंबाच्या वापरामुळे दूर व्हायला मदत होते. यासाठी एका वाटीत कोरफडीचा गर घ्या. त्यात कडुलिंबाच्या पानांची बारीक पेस्ट करून घाला. चेहऱ्यावर हा मास्क १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून एकदा या फेस पॅकचा वापर करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here