Home आरोग्य रडण्याचेही अनेक फायदे

रडण्याचेही अनेक फायदे

216
0

आपण आतापर्यंत हसण्याच्या फायद्यांबद्दल वाचले किंवा ऐकले असेल. पण रडण्याचेही अनेक फायदे असतात, हे तुम्हाला माहीत आहे का? रडणे हे कमकुवत पणाचे लक्षण . आहे, असे बहुतांश लोकांना वाटतं, मात्र खरं सांगायच तर हे भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे.
मानसिक थकवा आणि ताणामुळे त्रासलेले असता, अशा स्थितीत एखादी छोटीशी गोष्टही तुमच्या मनाला लागू शकते. आणि आपल्याला रडू येतं. पण तेव्हा जर तुम्ही रडलात, तर अर्ध्या-एक तासाने तुम्हाला मोकळं वाटू लागेल आणि तुमचं मनही शांत होईल. हसण्यामुळे शरीराला अनेक. फायदे होत असतात पण तुम्हाला माहीत आहे का,की रडण्याचे देखिल फायदे आहेत. तुमच्या निरोगी डोळ्यासाठी अश्रु खूप महत्त्वाचे आहेत असे संशोधनात आढळून आले आहे.लाइसोझाइम नावाचा द्रव अश्रुमध्ये आढळतो ज्यामध्ये बँक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात ते आपल्या डोळ्यांना संसर्गापासून वाचवते आणि डोळे स्वच्छ करते. रडल्यामुळे पँरा-सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम अँक्टिव्टेट होते ही PNS तुमच्या शरीराला आराम देते आणि पचनातली मदत करते.रडल्याने तुम्हाला आराम वाटतो आणि तुमचा मुड चांगला राहतो म्हणून कधी रडून जर आनंद मिळत असेल तर आपण कमकुवत नसुन अजून strong होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here