Home क्राइम पोलिसांनी चोराचा‎ सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले‎

पोलिसांनी चोराचा‎ सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले‎

273
0

चाळीसगाव :हॉस्पिटलसमोर लावलेली‎ दुचाकी चोरून नेताना,‎ दुचाकी मालकाने‎ आरडओरड केली.‎ त्याचवेळी गस्तीवरील‎ पोलिसांनी चोराचा‎ सिनेस्टाईल पाठलाग करून‎ ५०० मीटर अंतरावर त्याला‎ पकडले. चोरट्याची‎ चौकशी केली असता, त्याने‎ चोरीची दुसरी दुचाकीही‎ काढून दिली.‎ शहरालगतच्या करगाव‎ तांडा नं.३ चे रहिवासी रमेश‎ पुना चव्हाण यांच्या‎ मालकीची दुचाकी‎ (एमएच.२०-एसी.९५८७),‎ १६ मार्चला दुपारी १२‎ वाजेच्या सुमारास हिरापूर‎ रोडवरील हॉस्पिटलच्या‎ बाजूला लावलेली होती.‎संशयित रोहिदास पोपट मोरे‎ (रा. तळेगाव) याने दुचाकी‎ चोरली. ही बाब रमेश‎ चव्हाण यांच्या लक्षात येताच‎ त्यांनी आरडओरड केली.‎ त्याचवेळी या रस्त्याने‎ चाळीसगाव शहर पोलिस‎ ठाण्याचे उपनिरीक्षक सुहास‎ आव्हाड, पोलिस नाईक‎ दीपक पाटील, विनोद‎ खैरनार, राहूल सोनवणे,‎ ज्ञानेश्वर गिते हे गस्तीवर‎ जात होते. त्यांनी चोरट्याचा‎ पाठलाग करून त्याला‎ पकडले. संशयित मोरे‎ याच्याकडून चोरी केलेली‎ दुचाकी पोलिसांनी जप्त‎ केली. तसेच चौकशीत‎ संशयिताने चोरलेली दुसरी‎ दुचाकी (एमएच.१९‎ सीबी.१६५१) काढून दिली.‎

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here