Home आरोग्य बेळगावमध्ये कोरोना लसीचे जल्लोषात स्वागत…!

बेळगावमध्ये कोरोना लसीचे जल्लोषात स्वागत…!

53
0

मराठवाडा साथी न्यूज

बेळगाव : मागील वर्षभर कोरोना विषाणूच्या संसर्गाशी दोन हात केल्यानंतर आता कोरोनाची लस भारतामध्ये दाखल झाली आहे.कोरोना विषाणूवर मात करण्याच्या उद्धेशाने देशातील विविध भागांमध्ये दाखल झालेल्या लसींचे सर्वत्र अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.कोरोना लसीच्या आगमनाने बेळगावमध्ये लसीचे अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले.

पहाटे वाजेच्या सुमारास सीरमच्या कोविशिल्ड लस आणणाऱ्या वाहनाने कर्नाटक हद्दीत प्रवेश केला.त्यानंतर हे वाहन बेळगावच्या व्हॅक्सिन डेपो येथे आणण्यात आले. कोरोनाची लस तेथे दाखल होताच सुहासिनींनी लस आणलेल्या वाहनाची आरती केली.त्यानंतर वाहनाला तेथील कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यात आले.फक्त एव्हढेच नाही तर लस येण्याच्या आनंदात बँडबाजाचीही व्यवस्था करण्यात आली.

दरम्यान,१ लाख ४७ हजार लसी बेळगावात आल्या आहेत.या लसी आता जिल्ह्यांना पुरवण्यात येणार आहेत. ज्याअंतर्गत बेळगाव जिल्ह्यासाठी ३७ हजार लसी आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here