Home बीड पिसाळलेल्या कुत्र्यांनी उडवली गावकऱ्यांची झोप

पिसाळलेल्या कुत्र्यांनी उडवली गावकऱ्यांची झोप

362
0

मांजरसुबा : कोरोना महारामारीच्या धास्तीने जनजीवन विस्कळीत झाल्याने धुळे-सोलापुर राष्ट्रीय महार्गावर हाटेल मोडेल ठरलेला मांजरसुंबा परिसरात व्यवसायीक, मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच येथील हाटेल परिसराला गराडा घालणाऱ्या मोकाट कुत्र्यांची डोकेदुखी ठरलेलीच त्यातच भर म्हणून पिसाळलेल्या कुत्र्यांची मांजरसुंबा परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

मांजरसुंबा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस माजवला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत दोन नागरिक जखमी झाले आणि दोन ते तिन जनावरांना चावल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यातच पिसाळलेल्या श्वानावरील लस नेकनुर इथल्या सरकारी दवाखान्यात उपलब्ध नसुन रुग्नांना अंबाजोगाई किंवा बीडला पाठवण्यात येते. मांजरसुभा व परिसरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद अक्षरशः वाढलेला असून गल्लीबोळात मोकाट कुत्र्यांनी रहिवाशांच्या नाकात दम आणलेला आहे मोकाट कुत्रे झुंडी सह इतरत्र फिरताना भुंकताना तसेच वाहनधारकांच्या पाठी मागे धावताना दृष्टीक्षेपास पडतात नॉनव्हेजच्या दुकानाजवळ तर हे मोकाट कुत्रे झुंडी सह घुटमळताना दिसतात. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.मांजरसूंबा ग्रामपंचायत मांजरसुभेकरांना पाणी,रस्ते वीज आरोग्य आदी मूलभूत नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून टहो डतच असतात.शहरात राहणारा प्रत्येक नागरिक कर भरतो. आणि त्यापोटी सुविधा मिळाव्यात एवढी अपेक्षा करतो. मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबबाब्दारी ग्रामपंचायतचीच आहे.मोकाट आणि पिसाळलेला कुत्रा एखाद्या बालकाला,तरुणाला किंवा वृद्धाला चाव्वा घेतला तर त्याच्या रेबीजमुळे जीवाला धोका निर्मण होऊ शकतो.चाव्वा घेतल्यावर रुग्णालयात उपचार होईपर्यंत आणि त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याचे नातेवाईक जीव मुठीत धरूनच असतात.तरी चावणाऱ्या कुत्र्याच्या रेबीजचा पुन्हा केव्हा उदभ्व होईल हि भीती त्यांच्या मनात असते ती वेगळी! एकंदरीत मोकाट कुत्र्यांपासून मांजरसुभेकरांना ग्रामपंचायतकडून संरक्षण मिळाले पाहिजे.दिपावली अवघ्या काही दिवसावर असताना पथदिवे तुरळक ठिकानचेच चालु आहे . रात्री-अपरात्री कामावरून अनेक जण पायी,सायकलीवर,दुचाकीवरून आपल्या घरी अंधारात  जावे लागते.अश्यावेळी रस्त्यावरील मोकाट कुत्रे त्यांच्यावर भुकंत धावले तरी त्यांची त्रेधातिरपीट उडते.गेल्या अनेक दिवसापासुन ग्रामपंचायतने या मोकाट कुत्र्यांचा आणि पिसाळलेल्या कुत्र्याचं बंदोबस्त करू शकली नाही.त्याचे कारण मात्र कळत नाही.ग्रामपंचायतने मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त  करण्यासाठी प्रयत्न करावेत.व स्थानिक प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here