Home आरोग्य चित्रपटासाठी कोरोनाला विसरले प्रेक्षक…!

चित्रपटासाठी कोरोनाला विसरले प्रेक्षक…!

321
0

मराठवाडा साथी न्यूज

तिकीट खरेदी करण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी

मुंबई : मागील वर्षभरात अनेक दिवस कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चित्रपटगृह बंद होते.मात्र,आता यावर्षी हे सर्व टेन्शन बाजूला ठेऊन आपल्या आवडत्या हिरोच्या आगामी चित्रपटाच्या तिकीट खरेदीसाठी प्रेक्षकांनी कोरोनाला विसरून गर्दी केली आहे.

दक्षिण भारतामधील सुपरस्टार विजय सेतुपती आणि विजय थलपती यांची मुख्य भूमिका असलेला ‘विजय द मास्टर’ हा सिनेमा उद्या (१४ जाने.)रोजी प्रदर्शित होणार आहे.चित्रपटासाठी प्रेक्षक इतके उत्सुक आहेत की,कोरोना महामारीच्या काळातही या सिनेमाच्या तिकीट खरेदीसाठी टॉकीजच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत.फक्त एव्हढेच्च नाही तर देशभर या सिनेमाचे अनेक शो हाऊसफुल्ल झाले आहेत.हा चित्रपट देशभरातील ३८०० स्क्रीन्सवर एकाच वेळी प्रदर्शित होणार असून चित्रपटासाठी टॉकीजमधील ५० टक्के क्षमतेचाच वापर केला जात आहे.

मुंबईतील वडाळाच्या कार्निव्हल टॉकीजच्या बाहेर देखील विजयच्या फॅन्सनी मोठी गर्दी केली होती.त्यावेळी या सिनेमाचे पोस्टर लावलेले सॅनिटायझर आणि रोपट्याचे वाटप देखील करण्यात आले.

दरम्यान,या चित्रपटातील काही सीन्स ऑनलाईन लीक झाली होती.त्यामुळे “मास्टर सिनेमा बनवण्यासाठी दीड वर्ष लागले आहेत. तुम्हाला हा सिनेमा टॉकीजमध्ये पाहायला आवडेल अशी आशा आहे. मात्र हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी तुम्हाला कोणती व्हिडीओ क्लिप मिळाली, तर ती कृपया शेअर करु नका.’’ असे आवाहन चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी प्रेक्षकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here